आपल्या देशात सेक्सवर जाहीर चर्चा करणे हे असभ्यपणाचे लक्षण समजले जाते. त्यातही महिलांनी सेक्सवर बोलणे म्हणजे समाजाकडून तिच्या चारित्र्यावर थेट हल्ल्याला आमंत्रणच . यामुळे आपल्या देशात सेक्सवर कधीही जाहीरपणे बोलले जात नाही. पण वैद्यकिय दृष्ट्या विचार केला तर सेक्समुळे शारिरीकच नाही तर मानसिक गरजही पूर्ण होते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जी प्रजननाचे काम करते.
पण भारतीय संस्कृतीत यावर जाहीर भाष्य करणे अयोग्य मानले जाते. कारण सेक्स म्हणजे बंद दाराआड होणारी प्रणय क्रिडा. पण त्याला अनेक कंगोरेदेखील आहेत. यामुळे नैसर्गिक नियमाप्रमाणे महिलांनीही सेक्सची गरज असते. त्यासाठी त्यामागची वैद्यकिय कारणे कोणती हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
- हार्मोन्स संतुलित ठेवते
सेक्समुळे महिलांचे हार्मोन्स संतुलित राहते. यामुळे अनेक शारिरीक आजारांपासून स्त्रीचा बचाव होतो. तसेच सेक्समुळे तिचे मन आनंदित राहते. याचा परिणाम तिच्या दैनंदिन कामावरही होतो.
- प्रजनन
मातृत्व हा प्रत्येक स्त्रिच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. मूल झाल्यावर महिलांमध्ये अनेक हार्मोनल बदल होतात. जे तिच्या शारिरीक आणि मानसिक वृद्धीसाठी आवश्यक असतात. - चांगली झोप येते
सेक्सनंतर पुरुषांप्रमाणेच महिलांनाही शांत झोप लागते. त्याचा परिणाम तिच्या शरीराबरोबरच मनावरही होतो. यामुळे तिला मानसिक शांती मिळते.
- स्ट्रेस कमी होतो
जेव्हा एखादी व्यक्ती स्ट्रेसमध्ये असते तेव्हा तिला आपलं कोणी ऐकणारं किंवा आपल्याला जवळ घेणारं कोणी जवळ असाव असं वाटत असंत. त्याक्षणी तिला आधाराची गरज असते. जेणेकरुन तिचे मनमोकळे होते. स्ट्रेस कमी होतो. यामुळे अशा क्षणी सेक्स मोठी भूमिका पार पाडतं. प्रेमाच्या भावनेमुळे जोडीदाराचा स्ट्रेस कमी होतो. - पिरियडचा त्रास कमी होतो
तसेच सेक्समुळे महिलांना पाळीच्या दिवसात होणारा शारिरीक त्रासही कमी होतो. प्रामुख्या पाळीच्या वेळी काही महिलांना पोटदुखी, पोटऱ्यांमध्ये पेटके येणे , अतिरक्तस्त्राव होणे , डोकेदुखी अशा त्रासातून जावे लागते. पण सेक्समुळे तिला हा त्रास कमी होतो.