स्मार्ट वॉच वापरणे ही हल्ली फॅशन बनत चालली आहे. बाजारात तर अनेक प्रकारचे स्मार्टवॉच मिळतात. हाताच्या मनगटावर स्मार्ट वॉच खूपच छान दिसते. त्यामुळे स्मार्ट वॉचची क्रेझ तरुणांपासून वृद्धापर्यत दिसून येते. स्मार्ट वॉचचे अनेक फायदे देखील आहेत. आकर्षक दिसावे यासाठी बरेचजण ब्रॅडेड अर्थात महागडे वॉच घेतात आणि रोज वापरतात. पण, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल. काहीबाबतीत हातातील स्मार्ट वॉच जीवघेणं ठरण्याची शक्यता सांगितली जाते. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात, स्मार्ट वॉचचा आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो.
संशोधन काय सांगते-
एका रिसर्चनुसार, स्मार्ट वॉचच्या वापरामुळे तुमचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडेल असा दावा करण्यात आला आहे. संशोधनात, बाजारात विकल्या जाणाऱ्या 22 स्मार्टवॉच ब्रॅंडच्या स्मार्ट वॉचवर संशोधन केले गेले. यातील धक्कादायक बाब म्हणजे यांपैकी 15 स्मार्टवॉचमध्ये कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरणारे धोकादायक केमिकल सापडले आहेत. स्मार्टवॉचचा रबर बॅड बनवण्यासाठी 40 % केमिकल्सचा वापर केला जातो. बॅंड बनवण्यासाठी फ्लोरोइलास्टोमर रबर वापरला जातो. यातील फ्लोरोइलास्टोमर कंपाऊडमुळे कॅन्सर होऊ शकतो, असे संशोधनानुसार सांगण्यात आले आहे.
- स्मार्ट वॉचमध्ये वापरण्यात येणाऱ्या घातक केमिकल्समुळे मुत्रपिंडाशी संबधित आजार, प्रजनन समस्यांचा धोका निर्माण होतो.
- स्मार्ट वॉचमध्ये पीएफएएस नावाचा घटक असतो, हा घटक शरीरासाठी हानिकारक असतो. यामुळे लहान मुलांमध्ये अपगंत्व येऊ शकते.
- स्मार्ट वॉचच्या अतीवापरामुळे काही घातक बॅक्टेरिया नकळत शरीरात प्रवेश करतात. जे स्मार्टवॉचच्या बेल्टवर असतात. हे बॅक्टेरिया शरीरात शिरुन आतडे, कमजोर आणि संक्रमित करतात. याचा परिणाम रोगप्रतिकारशक्तीवर दिसून येतो. रोगप्रतिकारशक्ती कमजोर झाल्यास वारंवार सर्दी, खोकला, ताप आणि अतिसाराची समस्या सुरू होते.
- केवळ स्मार्टवॉचचं नाही तर मोबाईल, इयर बर्ड्स, लॅपटॉप, टिव्ही, कॉम्प्युटर, कॅमेरा यासारख्या वस्तुमधूनही मोठ्या प्रमाणात असे बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे अशा उपकरणांची वेळोवेळी स्वच्छता राखणे महत्वाचे आहे.
हेही पाहा –