स्किनवरील पोर्समध्ये जर घाण आणि अधिक तेल जमा झाले असेल आणि ओलाव्याशी त्याचा संपर्क आला तर पिंपल्स किंवा एक्ने येतात. त्याचसोबत त्याकडे लक्ष दिले नाही तर डाग पडतात.
पिंपस- एक्ने होण्यामागे काही कारणं असू शकतात. त्यापैकी एक कारण म्हणजे किसिंग. स्किन केअर बद्दल काळजी घेणाऱ्या लोकांना नेहमीच प्रश्न पडतो की, किसिंगमुळे पिंपल्स येतात का?
खरंच किसिंमुळे पिंपल्स येतात?
असे निश्चितपणे सांगता येत नाही की, किस केल्याने एक्ने येऊ शकतात. मात्र त्वचा ऑइली किंवा एक्ने प्रोन असेल तर बॅक्टेरिया ट्रांन्सफर होतात आणि समस्या होऊ शकते.
त्याचसोबत अधिक किस केल्याने स्किनला नुकसान पोहचू शकते. या कारणास्तव त्वचेवर इर्रिटेशन होऊ शकते आणि रेडनेस, पिंपल्सची समस्या उद्भवू शकते.
या व्यतिरिक्त ओठांवर लिप बाम किंवा दुसरे प्रोडक्ट्स लावल्याने तरीही पिंपल्स-एक्नेची समस्या उद्भव शकते. एक्सपर्ट्स असे मानतात की, अनहेल्दी फूड अथवा जेनेटिक्स सारख्या कारणामुले पिंपल्स-एक्नेची समस्या होऊ शकते. त्याचसोबत स्किन केअर रुटीन फॉलो न केल्यास ही पिंपल्स येतात.
पिंपल्सच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी चेहऱ्यावर क्लींजर किंवा फेसवॉशचा वापर करावा. दिवसातून दोन ते तीन लीटर पाणी प्यावे आणि आठवड्यातून 2-3 वेळा स्किन एक्सफोलिएशनचा ऑप्शन वापरावा.