Thursday, March 20, 2025
HomeमानिनीHealth Tips : फॅमिलीमध्ये कॅन्सर हिस्ट्री? मग फॉलो करा या गाईडलाईन

Health Tips : फॅमिलीमध्ये कॅन्सर हिस्ट्री? मग फॉलो करा या गाईडलाईन

Subscribe

जर तुमच्या कुटुंबात कॅन्सरचा इतिहास असेल तर तुम्हाला सावधगिरी बाळगणे आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारणे खूप महत्त्वाचे आहे.अनुवांशिकतेमुळे काही प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो, पण योग्य जीवनशैली, नियमित तपासण्या आणि प्रतिबंधक उपाय घेतल्यास हा धोका कमी करता येतो. योग्यवेळी काही गाईडलाईनस फॉलो केल्याने तुम्ही स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकता.

नियमित वैद्यकीय तपासणी

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित चाचण्या करून घ्या. म्हणजे मॅमोग्राफी, पॅप स्मीअर, कोलोनोस्कोपी, इत्यादी BRCA1 किंवा BRCA2 सारखे टेस्ट डॉक्टरांनी करायला सांगितले असतील तर ते करून घ्या.

निरोगी जीवनशैली ठेवा

कॅन्सरपासून वाचण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. तुमची जीवनशैली निरोगी असली पाहिजे. म्हणजे संतुलित आहार घ्या म्हणजे भरपूर फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स असलेले पदार्थ खा. प्रोसेस्ड फूड, साखर, जास्त मीठ आणि तेलकट पदार्थ टाळा.

नियमित व्यायाम

नियमित व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती वाढते.

धूम्रपान आणि अल्कोहोल टाळा

धूम्रपान आणि अल्कोहोल केल्याने हे अनेक प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढवतात.

वजन नियंत्रणात ठेवा

जास्त वजनामुळे ब्रेस्ट, कोलन, लिव्हर आणि इतर कॅन्सरचा धोका वाढतो. BMI नियंत्रणात ठेवा आणि वजन संतुलित ठेवा.

कुटुंबाचा इतिहास डॉक्टरला सांगा

कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास असल्यास आपल्या डॉक्टरांना माहिती द्या.यामुळे योग्य चाचण्या आणि प्रतिबंधात्मक उपाय लवकर सुरू करता येतील.

कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास असला तरी योग्य जीवनशैली, नियमित तपासणी आणि खबरदारी घेतल्यास आपण धोका कमी करू शकतो.

हेही वाचा : Health Tips : सर्दी पडशावर रामबाण काढा


Edited By : Prachi Manjrekar

Manini