संडे हो या मंडे रोज खा अंडे…पण बॉईल की ऑम्लेट?

अंड्याचे ऑमलेट करुन खाण्यापेक्षा अंडी उकडून खाण्याला सर्वाधिक पसंती दिली जाते. जाणून घ्या उकडलेली अंडी खाण्याचे फायदे.

It is better to eat boiled eggs or omelettes,benefits of eating boiled eggs
संडे हो या मंडे रोज खा अंडे...पण बॉईल की ऑम्लेट?

संडे हो या मंडे रोज खा अंडे असे आपण नेहमी म्हणतो. म्हणजेच काय रोज अंडे खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अंडी खाण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची आवश्यकता नाही. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आहे. त्यामुळे अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बऱ्याच जणांना अंडी बॉईल करुन म्हणजेच उकडून खायची की अंड्याचे ऑम्लेट करुन खायचे असा प्रश्न पडतो. मात्र अंडे उकडून खाणे आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. जगभरात अनेक लोक फार आवडीने अंडी खातात. अंड्यामुळे वजन वाढत नाही त्यामुळे डाएट करणारे किंवा जीमला जाणारे अनेक जण उकडलेली अंडी खाणे पसंत करतात. अंड्याचे ऑमलेट करुन खाण्यापेक्षा अंडी उकडून खाण्याला सर्वाधिक पसंती दिली जाते. जाणून घ्या उकडलेली अंडी खाण्याचे फायदे.

उकडलेली अंडी खाण्याचे फायदे

  • अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज, प्रोटीन, कॅल्शिअम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटामीन ए, बी५,बी६ बी१२,बी के  इत्यादी पोषक तत्वे असतात.
  • अंड्यांमध्ये ग्लूटन नावाचा पदार्थ असतो. त्याचा उपयोग आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्याचप्रमाणे त्वचेसाठीही होतो.
  • तज्ञांच्या म्हणण्यानुसार, अंड्यांच्या सेवेनाने शुक्राणूंटची क्वालिटी सुधारण्यास मदत होते असे म्हटले आहे.
  • आपण ऑम्लेट तयार करण्यासाठी तेल वापरतो त्यामुळे शरिरातील कोलेस्ट्रोल वाढते. मात्र अंडी उकडवून खाल्ल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • स्मृतीभ्रंशचा त्रास असणाऱ्यांनी अंडी खाणे उत्तम. अशा लोकांनी दररोज नाश्त्यामध्ये एक तरी उकडलेले अंड खावे त्याने मेंदू तल्लख राहण्यास मदत होते आणि विसराळूपणा देखील कमी होतो.
  • आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी उकडलेली अंडी खाणे फायदेशीर मानले जाते.

    हेही वाचा – मुलींना कमी वयात पीरियड्स आल्याने उंची खुंटते का?