Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthएकदा बनवलेला चहा सतत गरम करुन पिणं धोक्याचं

एकदा बनवलेला चहा सतत गरम करुन पिणं धोक्याचं

Subscribe

अनेकजण आपल्या सकाळची सुरूवात चहा पिऊन करतात. काहीजण दिवसातून अनेकवेळी चहा पिणं पसंत करतात. दिवस असो किंवा रात्र कोणत्याही वेळ हे लोक चहाला नाही म्हणत नाहीत. वारंवार चहा पिणं शरीरासाठी किती घातक आहे हे माहित असूनही लोकं वारंवार चहा पिण्याचा हट्ट कायम ठेवतात. शिवाय अनेकदा एकदा बनवलेला चहा पुन्हा पुन्हा गरम करुन पितात. परंतु ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते. एकचं चहा सतत गरम करुन प्यायल्याने तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.

चहा सतत गरम करुन पिणं धोक्याचं

- Advertisement -
  • चहा तयार झाल्यानंतर याला 15 ते 20 मिनिटांच्या आतच संपूर्ण चहा प्यावा. चहा जास्त वेळ ठेवून दिल्यास त्यामध्ये कडवटपणा निर्माण होतो. तसेच चहामध्ये असणारे पोषकतत्व देखील कमी होऊ लागतात.
  • चहा पुन्हा पुन्हा गरम केल्यास त्याच्यामध्ये असणारे निकोटिन आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. तसेच यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम होतो.
  • चहा बनवल्यानंतर जरी आपण त्याला झाकून ठेवले तरी त्यामध्ये बॅक्टेरिया जमा होऊ लागतात. यामुळे आपल्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी चहा बनवल्यानंतर लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करावा नाहीतर यामुळे अनेक रोग उद्भवण्याची शक्यता वाढते.
  • खूप वेळ बनवून ठेवलेला चहा प्यायल्याने विषबाधा होण्याची देखील दाट शक्यता असते.
  • सतत चहा गरम केल्याने चहामध्ये असलेले कॅफीनमुळे तुम्हाला जळजळल्यासारखे वाटू शकते. तसेच यामुळे तुम्हाला निद्रानाश देखील होऊ शकतो.

हेही वाचा :

नियमित खा उकडलेले चणे; वजन राहील नियंत्रणात

- Advertisment -

Manini