It’s Tea Time : कूल कूल थंडीत ट्राय करा चहाच्या या हेल्थी व्हरायटीज

It's Tea Time: Try these Healthy Varieties of Cool Cold Tea
It's Tea Time : कूल कूल थंडीत ट्राय करा चहाच्या या हेल्थी व्हरायटीज

प्रत्येकाच्याच दिवसाची सुरुवात ही चहाच्या झुरक्याने होत असते. प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीचा चहा चाखायला आवडत असते.कोणाला जास्त आलं घालून,कोणाला वेलची घालून अशा अनेक प्रकारच्या चहांचा आस्वाद घेण्यासाठी चहाप्रेमी आतुर असतात. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत चहाचा स्वाद हा प्रत्येक ठिकाणी बदलत असतो.त्यामुळे चहाच्या असे काही प्रकार आहेत की,ज्याव्दारे तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.’प्राण जाए मगर चाय न जाए’अशा चहावर नित्सिम प्रेम करणाऱ्यांनी जाणून घ्या, चहाचे हे प्रकार.

मसाला चाय

मसाला चाय ही पारंपारिक चहापेक्षा वेगळी आहे.यामध्ये जडीबुटी,लवंग आणि दालचिनीचा वापर केला जातो.चहा ही आरोग्याचा विचार करुनच बनवली जाते. या मसाला चायमध्ये आसामच्या ‘ममरी चाय’ या वनस्पतीचा वापर केला जातो.

हर्बल टी

हर्बल टी आरोग्य सुदृढ करण्यासाठी गुणकारी ठरते.ही चहा बनवण्यासाठी गरम पाण्यात लिंबू,धणे,काळीमिरी,दालचिनी, लवंग आणि आलं वापरुन बनवण्यात येते.

लेमन ग्रास टी

लेमन ग्रास टी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.या चहाची चव ही आंबट असते.ही चहा शरीराला डिटॉक्सीफाय करते.

ब्लॅक टी

चहा साधारणत: दूधाचा वापर केल्याशिवाय केली जात नाही.मात्र ब्लॅक टीमध्ये दूधाचा अजिबात वापर केला जात नाही.ही चहा खूप स्ट्राँग असते.

ग्रीन टी

आपल्या दिवसाची सुरुवात ग्रीन-टीने करु शकता.त्याचे मुख्य साहित्य अर्धा एक चमचा ग्रीन-टी पावडर आणि एक चमचा मध असे आहे. ही चहा आरोग्यासाठी खूप गुणकारी ठरते.

तंदूरी चाय

तंदूरी चहा ही पुण्याची स्पेशल चहा आहे.हा चहा मटक्यामध्ये दिला जातो.


हे ही वाचा – हिवाळ्यात तिळाचे पदार्थ खाण्याचे आरोग्यदायी फायदे ; वाचा रेसिपी