आपल्या प्रत्येकाच्या शरीरात कोणत्या ना कोणत्या कॅल्शियमची कमतरता असते. अशातच कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या गोष्टी खाऊ नये,हे आपल्याला बहुतेक वेळा माहित नसते. तसेच प्रत्येकवेळी बाहेरचे पदार्थ खाऊ नये यामुळे तुमच्या शरीरावर याचा अतिशय वाईट परिणाम झालेला दिसून येतो. अशातच गूळ आणि तूप खाण्याने अनेक समस्या दूर होतात.
नैसर्गिकरित्या वजन वाढवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे आपल्या आहारात नेहमी गूळ आणि तूपाचे सेवन झालेच पाहिजे. काही माणसांना तूप आवडत नाही अशावेळी देशी तूपाने बनवलेले पदार्थ जर का तुम्ही खाल्ले तर याचा परिणाम लगेच तुम्हाला दिसून येतील. तसेच गूळ आणि तूप आपल्या आरोग्यासाठी उत्तम असून याचा शरीरावर कोणताही साईड इफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळत नाही. तसेच आता आपण जाणून घेऊया कमकुवत शरीरासाठी गूळ आणि तूप कशाप्रकारे फायदेशीर आहे.
तुपाचे फायदे
- तूप हे नैसर्गिक वजन वाढवणारा पदार्थ आहे.
- तूप हे गोड आहे तसेच शरीरासाठी थंड देखील आहे.
- यामुळे शरीरातील वात आणि पित्त शांत होते.
- तसेच तूप सेवन केल्याने पचन सुधारते.
- तुपामधल्या पोषक घटकांनी स्नायू मजबूत होतात.
- तसेच स्मरणशक्ती, केस, त्वचा, प्रजनन क्षमता, बुद्धिमत्ता आणि बरेच काही सुधारते.
गुळाचे फायदे
- गूळ हे निरोगी गोड पदार्थांपैकी एक आहे जे पांढर्या साखरेपेक्षा चांगले आहे.
- हे चवीला गोड असते ज्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही.
- त्यामुळे प्रतिकारशक्ती सुधारण्यास देखील मदत होते.
- गुळाचा चहा देखील तुमच्या आरोग्यासाठी एक उत्तम स्रोत आहे.
- कोरडे आले आणि काळी मिरी या सोबत गूळ घेतल्यास श्वसनाच्या समस्या दूर होतात.
वजन वाढवण्यासाठी तूपाचे आणि गुळाचे ‘असे’ करा सेवन
- वजन वाढण्यासाठी आणि अशक्तपणासाठी गूळ आणि तूप सम प्रमाणात घ्यावा.
- यामुळे तुमच्या शरीराला शक्ती आणि ऊर्जा मिळेल.
- गूळ आणि तूप खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जेवणासोबत किंवा जेवणानंतर.
- 1 टीस्पून देशी गाईच्या तूपाने आणि 1 चमचा देशी गुळाने सुरुवात करा.
- तसेच एकदा का हा डोस तुम्ही 2 आठवडे नियमित घेत राहिलात तर तुमच्या वजनात तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
- म्हशीच्या तूपाचा कोणताच त्रास तुमच्या शरीरावर होणार नाही.
- तसेच यामुळे जेवण चांगले जिरते. आणि यामुळे पचनसंस्था सुरळीत राहते.