चांगल्या आरोग्यासाठी झोपण्यापूर्वी गुळासोबत गरम पाणी प्या

jaggery and luck warm water before sleeping for good health
चांगल्या आरोग्यासाठी झोपण्यापूर्वी गुळासोबत गरम पाणी प्या

शरीरासाठी लाभदायक असलेला पदार्थ म्हणजे गूळ. चवीने गोड आणि स्वभावाने गरम असलेला गूळ ज्यामध्ये खूप पौष्टिक घटकांचा समावेश आहे. जर तुम्ही गूळ आणि गरम पाण्याचे सेवन केलं तर तुम्हाला चार गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू शकते.

आपल्याकडे बऱ्याचं लोकांना सकाळी उठल्या उठल्या चहाची पिण्याची सवय असते. चहाशिवाय त्यांच्या दिवस सुरुचं होत नाही. मात्र सकाळी उठल्यावर चहा घेतल्यास शरीराचे नुकसान होते. त्यामुळे आयुर्वेदानुसार दररोज सकाळी उठल्या उठल्या अनोश्या पोटी गूळ आणि गरम पाण्याचे सेवन करा यामुळे तुमच्या आरोग्यांवर चांगला परिणाम होईल. तसंच गॅस, आंबटपणा, पोटदुखी, बद्धकोष्ठता या गंभीर आजारांपासून तुम्हाला मुक्तता मिळेल.

आपल्याला वेगवेगळ्या रोगांवर नैसर्गिक औषधाबद्दलची माहिती आयुर्वेदामधून मिळून उपचार सापडते. नैसर्गिक असल्याने त्याचा काहीही दुष्परिणाम शरीरांवर होत नाही. आज आपण गुळाचे काही खास वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत.

  1. ज्यांना अन्न पचनाची समस्या असेल यांसाठी गूळ आणि गरम पाणी हे रामबाण उपाय आहे.
  2. तसंच गुळाचे फक्त सेवन केल्याने देखील पचनक्रिया सुधारते, रक्त स्वच्छ होतं, चयापयच क्रिया चांगली राहते.
  3. गूळ आणि एक ग्लास पाणी किंवा दुध हे पेय प्यायल्याने पोटात थंडावा वाटतो. तसंच गॅसचा त्रास उद्भवणार नाही. याशिवाय ज्यांना गॅसचा त्रास आहे त्यांनी रात्रीच्या किंवा दुपाच्या जेवणानंतर गूळाचे सेवन करावे.
  4. ज्या लोकांना खाण्यापिण्याच्या वाईट सवयी असतात त्यांचे रक्त अशुद्ध बनते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त सारख्या आजारांना सामोर जावं लागतं. त्यामुळे अशा लोकांनी दररोज एक गुळाचा खडा खाऊन गरम पाणी प्यावे. यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
  5. जर तुम्हाला संपूर्ण दिवस थकवा जाणवतं असेल तर अशावेळेस सकाळी अनोश्या पोटी गूळ नक्की खा. यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढून शरीरातील शुगर पण नियंत्रणात राहते.