आपण नेहमीच मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर गोड पदार्थ खाणे पसंद करतो. जेणेकरुन पोटासंबंधित समस्या उद्भवू नये. अशातच गुळ एक हेल्दी ऑप्शन मानला जातो. याची चव प्रत्येकालाच आवडते. गुळात लोह, कॅल्शिअम, फॉस्फोरोस, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन-सी सारखे महत्त्वाचे न्युट्रिएंट्स असतात, जे शरिरासाठी फायदेशीर असतात. अशातच तुम्ही बनावट गुळ कसा ओळखाल याच बद्दलच्या काही ट्रिक्स आपण पाहणार आहोत.
-खाऊन पहा
भेसळयुक्त नसलेल्या गुळाची चव नेहमीच गोड असते. मात्र त्याच्या चवीत थोडाजरी फरक असेल तर समजून जा तो बनावट आहे. बनावट गूळ हा थोडा कडवट आणि खारट लागो.
-पाण्याचा वापर
गुळाची शुद्धता ओळखण्यासाठी तुम्ही एका ग्लासात पाणी घ्या आणि त्यात गुळाचे लहान-लहान तुकडे कापून टाका. जर तो बनावच नसेल तर हळूहळू विरघळेल. मात्र बनावट असेल तर ग्लासच्या खाली चिकटून राहिल.
-रंगाकडे पहा
शुद्ध गुळ ओळखायचा असेल तर त्याच्या रंगाकडे पहा. शुद्ध गुळाचा रंग हा डार्क ब्राउन असतो. जर तो हलका पिवळसर दिसला तर तो अजिबात खाऊ नका. त्यात भेसळ केल्यानंतर गूळाचा रंग बदलला जातो.
हेही वाचा- काजूचा पदार्थांमध्ये असा सुद्धा करा वापर