Thursday, April 25, 2024
घरमानिनीFashionआईच्या दूधापासून ज्वेलरी बनवण्याचा नवीन ट्रेंड

आईच्या दूधापासून ज्वेलरी बनवण्याचा नवीन ट्रेंड

Subscribe

आयुष्यातील सुंदर आठवणी आपल्या मनात घर करुन राहतातच. पण त्या आपल्या समोर दिसाव्यात यासाठी त्याची फोटोफ्रेम बनवली जाते. परंतु सध्या आईच्या दूधापासून ज्वेलरी बनवण्याचा नवा ट्रेंड आला आहे. हे ऐकून थोडं विचित्र वाटेल पण ती युनिक आयडिया चैन्नईत राहणाऱ्या २८ वर्षीय संगीता पुरुवेश मेहता हिला सुचली आहे.

एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या करियरला थोडं बाजूला ठेवत संगीताला काहीतरी हटके करायचे होते. खरंतर हा अनोखा ट्रेंड सुरु करण्यासाठी तिला तिच्या अमेरिकेतील एका मैत्रिणीने मदत केली. यावर एक वर्ष संगीताने रिसर्च केला. तर तिला पहिला ऑर्डर २०१६ मध्ये मिळाली होती. पण आज ती २ हजार ते १ लाख रुपयांपर्यंतची मिल्क ज्वेलरी तयार करते.

- Advertisement -

आईच्या दूधापासून डायमंड, सोनं आणि चांदीची ज्वेलरी ती बनवते. खास गोष्ट अशी की, या ज्वेलरीवर हॉलमार्क ही असते.

- Advertisement -

कशी बनवली जाते हे ज्वेलरी?
संगीता अशा प्रकारची ज्वेलरी बनवण्यासाठी १०-१५ मिली ब्रेस्ट मिल्कचा वापर करते. जेव्हा एखादा ग्राहक तिला संपर्क करचो तेव्हा ती त्यांना ब्रेस्ट मिल्क पाठवण्यास सांगितले. या मिल्कमध्ये फूड ग्रेड प्रिजर्वेटिवचा वापर करते. जेव्हा हे दूध सेमी सॉलिड रुपात तयार होते तेव्हा साच्यात टाकून सेट होण्यासाठी ठेवते. साचा एकदा तयार झाला की त्याचा वापर ज्वेलरीत केला जातो. तुम्हाला हव्या त्या आकाराची ज्वेलरी बनवून मिळते. परंतु तेव्हा पूर्ण प्रोडक्ट तयार होते तेव्हा ती, ही ज्वेलरी गरम ठिकाणी आणि केमिकल पासून दूर ठेवा असे ही सांगते.

संगीता ही momma’s milk love नावाच्या वेबसाइट वरुन ऑर्डर्स घेते. ती नेहमीच प्रयत्न करते की, प्रत्येक वेळी वेगवेगळी ज्वेलरी बनवली जाईल.


हेही वाचा- Best female perfumes : महिलांकडे ‘हे’ 5 perfumes असायलाच हवेत

- Advertisment -

Manini