Friday, January 10, 2025
HomeमानिनीLifestyle- नोकरी करावी की बिझनेस?

Lifestyle- नोकरी करावी की बिझनेस?

Subscribe

करियरच्या सुरुवातीच्या दिवसात नोकरी करावी की बिझनेस हा प्रश्न आपल्यापैकी बहुतेकांना पडतो. अशावेळी प्रामुख्याने मराठमोळ्या कुटुंबात मुलांना नोकरीचाच पर्याय निवडावा असा सल्ला दिला जातो. यामागचे कारण जरी नोकरीमुळे मिळणारी आर्थिक सुरक्षितता हे असलं तरी सध्याच्या काळात स्टार्ट अपसाठीही बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पण त्यासाठी गरज आहे ती तुम्ही ज्या क्षेत्रात स्टार्ट अप करू इच्छितात त्याचा सखोल अभ्यास करण्याची आणि वेळीच धाडसी निर्णय घेण्याच्या क्षमतेची.

करियर एक्सपर्ट्सच्या मते नोकरी आणि बिझनेस या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून दोघांमध्ये आव्हानेही आहेत. दोघांचे फायदे आणि तोटेही आहेत.यामुळे निर्णय घेताना दोन्ही क्षेत्रातील शक्यता, क्षमता आणि संधी यांचा विचार करूनच नोकरी किंवा बिझनेस करण्यचा निर्णय घ्यावा.

- Advertisement -

जर तुम्ही नोकरीचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला विविध क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील.

त्यासाठी तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल.

- Advertisement -

त्यासाठी फक्त कष्टच पुरेसं नसते तर कंपनीचा फायदा करून देणारी, त्याचा विस्तार करून देणाऱ्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात. जेणेकरुन कंपनीच्या उन्नतीबरोबर तुमचीही पदोन्नती होईल.

तसेच समोरून दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारायला शिका. त्यामुळे तुम्हालाही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तसेच तुम्ही कामचोर नाहीत.

जबाबदार आहात हे वरिष्ठांना दाखवून देण्याची, स्वतला सि्दध करण्याची तुम्हाला संधी मिळेल.

जर तुम्ही बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर सध्या मार्केटमध्ये सुरू झालेल्या स्टार्ट अपची माहीती मिळवा.

त्यातील कोणते बिझनेस केव्हा सुरू झाले आज त्यांचे स्वरूप काय ते तपासा.

त्यामुळे नक्की कोणता बिझनेस करायचा हे स्पष्ट होईल.

ज्यावेळी तुम्ही बिजनेसमन असता तेव्हा तुमचे सगळे निर्णय तुमचे स्वतचे असतात.

त्यामुळे फायदा आणि तोट्यासाठीही तुम्हीच जबाबदार असता.

कर्मचारी फक्त तुम्ही दिलेल्या सूचनांचे पालन करत दिलेले काम करत असतात.

पण बिजनेस स्ट्रैटेजी तुमची असते. बिजनेस कसा वाढावयाचा त्यासाठी काय करायला हवं हे सगळ तुम्हाला पाहावं लागतं.

त्यामुळे जर य़शस्वी झालात तर यश तुमचे पण अयशस्वी झालात तर त्यालाही तुम्हीच जबाबदार असणार .

जेव्हा तुम्ही बिजनेसमन असता तेव्हा कामाचे बंधन तुम्हाला नसते जे कर्मचाऱ्यांसाठी असते.

त्यामुळे तुम्ही स्वतसाठी कुटुंबासाठी वेळ काढू शकता.

नोकरीत सुट्टयाव्यतिरिक्त या गोष्टी शक्य होत नाहीत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -

Manini