Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
Homeएज्युकेशनJob Skills : नोकरी मिळवण्यासाठी ही कौशल्ये आवश्यक

Job Skills : नोकरी मिळवण्यासाठी ही कौशल्ये आवश्यक

Subscribe

हल्लीच्या काळात नोकऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागले आहेत. नोकरीच्या अनेक संधी जरी उपलब्ध असल्या तरी आपल्याला मिळालेली नोकरी टिकवून ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. एका संशोधनानुसार असे समोर आले आहे की काही वर्षांतच 9 कोटींहून अधिक नोकऱ्या जातील. यासाठीच भविष्यात तुमचे करिअर सुरक्षित करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नवीन तंत्रज्ञान शिकणे आणि त्याचा अवलंब करणे. सध्या एआयचा म्हणजेच कृत्रिम तंत्रज्ञानाचा जमाना आहे. एआयमुळे प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडून येत आहेत. त्यामुळे या येत्या काळातील एआय समोर टिकून राहणे आणि त्याचा योग्य तो वापर करणेदेखील तितकेच गरजेचे आहे. जाणून घेऊयात अशा काही कौशल्यांबद्दल ज्या नोकरीकरता अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.

नुकत्याच फ्युचर ऑफ जॉब्स या संस्थेमार्फत करण्यात आलेल्या संशोधनानुसार , येत्या पाच वर्षांत मोठ्या बदलांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे बदल तंत्रज्ञान विकास, डिजिटल परिवर्तन आणि जगाची हरित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल यामुळे होणार आहेत. अहवालातून हे स्पष्ट झाले आहे की जुन्या कौशल्यांची गरज हळूहळू कमी होईल आणि तांत्रिक कौशल्ये शिकणे सगळ्यांसाठीच गरजेचे असेल.

सतत शिक्षण, कौशल्य विकास आणि नवीन कौशल्ये शिकणे यासारख्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करून कंपन्यांनी हे बदल चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि त्यांना मॅनेज करण्यास सुरुवात केली आहे. आजच्या या लेखात जाणून घेऊयात अशा 10 कौशल्यांविषयी.

Job Skills: These skills are required to get a job

1. विश्लेषणात्मक विचार (Analytical thinking):
समस्या खोलवर समजून घेण्याची आणि त्यानुसार उपाय शोधण्याची क्षमता असायला हवी.

2. लवचीकपणा आणि चपळता (Resilience, flexibility and agility) :
बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता असणे गरजेचे आहे.

3. नेतृत्व आणि सामाजिक प्रभाव (Leadership and social influence):
लोकांना प्रेरणा देणे आणि त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणे.

4. सर्जनशील विचारसरणी (Creative Thinking) :
नवीन आणि अद्वितीय कल्पनांनी समस्या सोडवणे.

5. प्रेरणा आणि आत्म-जागरूकता (Motivation & Self Awareness) :
तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला प्रेरित ठेवणे आणि कायम आत्मविश्वासाने येणाऱ्या समस्यांना सामोरे जाणे.

6. तांत्रिक साक्षरता (Technological Literacy) :
आधुनिक तंत्रज्ञान समजून घेणे आणि त्याचा योग्य वापर करणे.

7. सहानुभूती आणि लक्षपूर्वक ऐकणे (Empathy and Active Listening) :
इतरांच्या भावना समजून घेणे आणि त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकणे.

8. कुतूहल आणि आयुष्यभर शिकण्याची इच्छा (Curiosity and Lifelong Learning):
प्रत्येक नवनव्या गोष्टीबद्दल कुतूहल बाळगायला हवे आणि नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा कायम ठेवायला हवी.

9. प्रतिभा व्यवस्थापन (Talent Management):
लोकांमध्ये असलेल्या क्षमता, प्रतिभा यांचा शोध घेणे, त्यांचा विकास करणे आणि त्यांचा वापर करणे.

10. ग्राहक सेवा (Service Orientation and Customer Service) :
ग्राहकांच्या गरजा समजून घेणे आणि त्या पूर्ण करणे.

हेही वाचा : Religious Tips : दुसऱ्यांच्या या वस्तू कधीच घरी आणू नये


Edited By – Tanvi Gundaye