योगासनात सूर्यनमस्कार हे सर्वात महत्त्वाचे आणि सर्वश्रेष्ठ आसन आहे. सूर्य नमस्कारामध्ये सर्वच आसनाचा समावेश असतो. त्यामुळे दररोज सूर्यनमस्कार केल्याने व्यक्तीचे शरीर निरोगी आणि उत्तम राहते. आज आम्ही तुम्हाला सूर्यनमस्कार करण्याचे फायदे सांगणार आहोत.
सूर्यनमस्कार करण्याचे फायदे
- सूर्यनमस्कार नियमित केल्याने हातपायाचे दुखणे दूर होतात आणि हाडांमध्ये बळकटपणा येतो. तसेच दररोज सूर्यनमस्कार केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
- त्वचेचे आजार देखील सूर्यनमस्कार केल्याने ते कमी होतात. त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार केल्याने तुमचा चेहरा सतेज राहतो आणि सुरकुत्या पडण्यास प्रतिबंध होऊन तुम्ही चिरतरुण राहता.
- मासिक पाळीत अनियमितता असल्यास दररोज दहा सूर्यनमस्कार करावे. यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते. तसेच पोटाच्या समस्या नाहीशा होऊन पचन क्रिया देखील सुधारते.
- सूर्यनमस्कार ऊर्जादायी आणि आरामदायी असतात. सूर्यनमस्कार केल्याने रक्तभिसरण सुधारते. रक्तभिसरण उत्तम झाल्यास केस गळणे, कोंडा होणे, केस पांढरे होणे अशा समस्या दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर पचनसंस्था देखील सुधारते.
नियमित सूर्यनमस्कार केल्याने वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे संतुलन साधले जाते.
- सूर्यनमस्कार केल्याने महत्त्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा वाढतो. तसेच हृदय व फुफ्फुसे यांची कार्यक्षमता वाढते आणि स्नायू बळकट होण्यास देखील मदत होते. तर पाठीचा मणका आणि कंबर लवचिक होते.
- सूर्यनमस्कार घातल्याने पोटाजवळची चरबी वितळून पोटाचा घेर कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
- Advertisement -
हेही वाचा :
15 दिवसात वजन होईल कमी करा ‘ही’ योगासन
- Advertisement -
- Advertisement -