Sunday, April 21, 2024
घरमानिनीनुकताच जॉब लागलाय...

नुकताच जॉब लागलाय…

Subscribe

आजकाल बरीच तरुण मंडळी कमी वयात कमवायला लागली आहे. नक्कीच ‘ही’ गोष्ट उत्तमच आहे. जेव्हा तुम्ही पैसे कमवायला लागतात. तेव्हा तुम्ही स्वावलंबी बनता. मात्र, असे असले तरी केवळ पैसे कमावणे इतकेच महत्वाचे नाही तर ते योग्यरीत्या हाताळणे देखील तितकेच महत्वाचे आहे. कारण अनेक तरुण मंडळी नुकतचं जॉबला लागून सुद्धा अनेक आर्थिक चुका करायला सुरुवात करतात. कष्टाने कमावलेले पैसे खर्च तरी होतात किंवा काही चुकांमुळे आर्थिक नुकसान तरी होते.

बजेट सेट न करणे –

- Advertisement -

ही एक कॉमन चूक आहे जी बहुतांश जण करतात. जॉबला लागल्यावर सर्वात पहिले बजेट सेट करणे गरजेचे असते. अनेकदा अनावधानाने जास्त खर्च होतो आणि नंतर त्या गोष्टींचा पशात्ताप देखील होतो. यासाठी बजेट सेट करणे महत्वाचे असते. जेणेकरून तुम्ही तुमच्या गरजेनुसार खर्च करू शकाल. बजेट शिवाय आपत्कालीन वेळेसाठी थोडे पैसे अवश्य बाजूला ठेवत जा.

गुंतवणूक योजनेकडे दुर्लक्ष करणे –

- Advertisement -

नुकतेच जॉबला लागणारे अनेक जण गुंतवणूक योजनेकडे दुर्लक्ष करतात. जर तुमच्याकडे कौटूंबिक भार कमी असेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या उत्पन्नचा काही हिस्सा गुंतवू शकता. ज्याने तुम्हाला भविष्यात चांगला परतावा मिळेल.

क्रेडिट कार्डचा वापर करणे –

जर तुम्ही नुकतंच जॉबला लागला असाल तर क्रेडिट वापरण्यास सुरुवात करू नका. कारण जवळ क्रेडिट कार्ड असल्यास तुमच्याकडून अधिक खर्च होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातील केवळ डेबिट कार्डचा वापरा. एकदा का तुम्ही पैशांचे व्यवस्थापन शिकलात की, मग तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकता.

कमाईपेक्षा अधिक खर्च करणे –

अनेक जणांना कमाईपेक्षा अधिक खर्च करण्याची सवय असते. पण, ही सवय हानिकारक ठरू शकते. अनेक जण तर कर्ज काढून आपल्या इच्छा पूर्ण करतात. असे करणे टाळले पाहिजे. आपल्या खरेदीचा मोह आपल्याला टाळता यायला हवा.

 

 

 


हेही वाचा : शारिरीक फिटनेसबरोबर आर्थिक फिटनेसही महत्वाची

- Advertisment -

Manini