घरCORONA UPDATECovid19 च्या उपचारांसाठी काळे जिरे फायदेशीर, तज्ञांची माहिती

Covid19 च्या उपचारांसाठी काळे जिरे फायदेशीर, तज्ञांची माहिती

Subscribe

काळ्या जिऱ्यात अनेक औषधी गुणधर्म असतात.

संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. व्हायरस पसरू नये यासाठी माणसे एकमेकांपासून दूर राहत आहेत. शरीरातील इम्युनिटी कसी वाढवता येईल याकडे सर्व लक्ष देत आहेत. इम्युनिटी वाढवण्यासाठी लोक घरच्या घरी अनेक उपाय करत आहेत. काळे जिरे कोरोना उपचारांसाठी फायदेशीर असल्याचे तज्ञांच्या अभ्यासातून समोर आले आहे. काळे जिरे हे किचनमध्ये आपल्याला सहजतेने उपलब्ध होते. काळ्या जिऱ्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे कोरोना काळात काळ्या जिऱ्याचे सेवन फायदेशीर असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात काळ्या जिऱ्यामध्ये असणारे तत्व कोरोना संक्रमण होण्यापासून रोखतात असे म्हटले आहे. (Kalonji Black cumin is beneficial for the treatment of covid19, expert information)

तज्ञांनी केलेल्या अभ्यास असे समोर आले आहे की, काळ्या जिऱ्यात थाइमोक्विनोन नावाचा एक घटत असतो जो कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीना चिटकून फफ्फुसात होणारे इंन्फेक्शन रोखण्यास मदत करते. त्याचप्रमाणे काळ्या जिऱ्याचा उपयोग इन्फेक्शन आणि शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी देखील करण्यात येतो.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात त्यांना असे आढळले की, निगेला सॅटिवा नावाच्या एका वनस्पतीचे बियाणे हे काळे जिरे म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियाचे मूळ निवासी असलेले लोक या वनस्पतीचा वापर सूज आल्यास किंवा कोणत्याही वैद्यकीय गोष्टींसाठी पारंपरिक पद्धतीने ओषध म्हणून  करत आले आहेत. सिडनीच्या विश्वविद्यालयात प्रोफेसरांनी दिलेल्या माहितीनुसार, निगेल सॅटिवाच्या बियांचा उपयोग करुन कोरोना संक्रमण रोखता येतो. कोरोनामुळे फुफ्फुसांची होणारी हानी देखील काळ्या जिऱ्यामुळे रोखता येते. तसेच कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी काळ्या जिऱ्याचा वापर करता येतो असे त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – Delta Variant: खतरनाक डेल्टा व्हेरियंटचा १३५ देशांमध्ये विस्फोट, जागतिक संसर्गाचा आकडा २० कोटी पार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -