Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीKanjivaram & Kanchipuram saree : कांजीवरम आणि कांचीपुरम साडीत फरक काय ?

Kanjivaram & Kanchipuram saree : कांजीवरम आणि कांचीपुरम साडीत फरक काय ?

Subscribe

साडी म्हटलं की तिचे असंख्य प्रकार आपल्या डोळ्यांसमोर येतात. जसे की पैठणी, शालू , बनारसी साडी, पटोला, बांधणी इत्यादी. यापैकीच असलेले प्रकार म्हणजे कांचीपुरम, कांजीवरम आणि कांची पट्टू साड्या. या तामिळनाडूतील आलिशान रेशमी साड्या आहेत. या साड्या त्यांच्या कारागिरीसाठी, सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखल्या जातात. अनेक पारंपरिक सणसमारंभांकरता तसेच विवाह सोहळ्यांकरता या साड्या वापरण्याकडे अनेक महिलांचा कल असतो. कांजीवरम आणि कांचीपुरम या साड्यांमध्ये नेमका फरक काय हा प्रश्न अनेक महिलांना पडलेला असतो. आजच्या या लेखातून जाणून घेऊयात कांजीवरम आणि कांचीपुरम या साडीतील नेमका फरक काय याविषयी.

तसं पाहायला गेलं तर काहीजण याला कांजीवरम म्हणतात तर काहीजण कांचीपुरम म्हणतात. पण नावं जरी वेगळी असली तरी हा एकच साडीप्रकार आहे. या दोन्ही साड्या सारख्याच आहेत.

कांजीवरम आणि कांचीपुरममधील गोंधळ प्रामुख्याने प्रादेशिक उच्चारांमध्ये आहे. कांचीपुरम ही एक अशी जागा आहे जिथून या साड्यांचा उगम झाला आहे तर कांजीवरम म्हणजे या प्रदेशाच्या वेगवेगळ्या भागात या साडीचे नाव असे उच्चारले जाते. यावरूनच या साडीला कांजीवरम किंवा कांचीपुरम म्हटले जाऊ लागले.

कांजीवरम साड्यांबद्दल सर्व काही :

कांजीवरम साड्यांची परंपरा ही शतकानुशतके जुनी आहे, ज्याचा समृद्ध वारसा हजारो वर्षांपूर्वीचा आहे. तामिळनाडूच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक पद्धतींमध्ये खोलवर या साड्या रुजल्या आहेत.  या साड्या शुद्ध तुतीच्या रेशमापासून काळजीपूर्वक विणल्या जातात. ज्यात मंदिर वास्तुकला, पौराणिक कथा आणि निसर्ग यांचे चित्रण केलेले असते.
अर्थात, त्यांच्या भव्यतेचे रहस्य त्यांच्या विणकामाच्या तंत्रात आहे. कांजीवरम साडी तयार करण्यासाठी, साडीच्या आतील भाग आणि बॉर्डर स्वतंत्रपणे विणल्या जातात आणि नंतर शिलाई दिसणार नाही अशा प्रकारे काळजीपूर्वक जोडल्या जातात. या साड्या अधिक तपशीलवार शिवल्या जातात. या सिल्क साड्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जरीचा वापर. सोने किंवा चांदीपासून बनवलेले धागे यामुळे या साड्या अधिक मौल्यवान असतात.
या साड्या नुसत्या परिधान केल्या जात नाहीत, तर त्या पिढ्यान् पिढ्या महिलांना दिल्या जातात, ज्यामुळे त्या एक आदर्श वारसा आहेत.

हेही वाचा : Solo Trip Tips : सोलो ट्रिप बनवा हॅप्पी या सोप्या टिप्सनी


Edited By – Tanvi Gundaye

Manini