कपूर घराण्यातील करिश्मा कपूर आणि करिना कपूर या दोघी बहिणी आहेत. आजपर्यत दोघींनीही बॉलिवूडमध्ये अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे केले आहेत. करीनाला बॉलिवूड इंडस्ट्रीत बेबो या नावाने ओळखले जाते तर करिश्माला लोलो असं टोपणनाव आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत दोघी बहिणींची जोडी खूपच फेमस आहे.
काही दिवसांपूर्वी राज कपूर यांची 100 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला संपूर्ण कपूर घराणे उपस्थित होते. करिश्माने कपूर कुटूंबाबत अनेक रंजक किस्से या कार्यक्रमात सांगितले आहेत. या शोमध्ये करिश्मा कपूरने तिला लो लो आणि करिनाला बेबो का म्हणतात? त्यांना ही टोपणनावे कोणी ठेवली? हे सिक्रेट शेअर केलं आहे.
करिश्माला लोलो नाव कसं पडलं?
करिश्मा म्हणाली की, एक विदेशी अभिनेत्री जीना लोलोब्रिगीडीच्या नावावरून लोलो हे नाव घेण्यात आले आहे. माझी आई तिची फॅन आहे. याशिवाय आणखी सांगायचं झाल्यास, माझी आई सिंधी आहे. ती लोलो लोली नावाचा गोड पदार्थ बनवत असे. त्यामुळे मला हे नाव पडलं, असे करिश्मा म्हणाली.
करीनाला बेबो नाव कसं पडलं?
याशिवाय करीना कपूरच्या बेबो टोपणनावाबद्दल करीश्मा कपूर म्हणाली की, जेव्हा करिना आली, तेव्हा सगळ्यांना वाटलं की, आता तिचंही काहीतरी मजेशीर, गोंडस नाव असावं आणि मग बाबांनी तिला बेबो असं म्हणायला सुरूवात केली. अशा प्रकारे करीनाला बेबो आणि मला लोलो ही नाव पडली.
कपूर घराण्यातील अनेक सदस्यांना डब्बू, चिंटू, चिपू अशी टोपणनावं नावे ठेवण्यात आली आहे. राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण बॉलिवूड पोहोचले होते. या सेलिब्रेशनमध्ये करीना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, रणधीर कपूर, बबिता, रणबीर कपूर, आलिया भट्ट, नीतू कपूर यांसह कपूर घराण्यातील अनेक मंडळी उपस्थित होती.
हेही पाहा –