Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीParenting Tips : मुलांसोबत नॅशनल पार्कला जाताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात...

Parenting Tips : मुलांसोबत नॅशनल पार्कला जाताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Subscribe

पालक आपल्या वेळेचे नियोजन करून मुलांना वेळोवेळी कुठेतरी घेऊन जातात. मुलांसोबत चांगला वेळ घालवतात. काही पालक मुलांना अशा ठिकाणी नेतात जिथे त्यांना पुस्तकी ज्ञान देखील मिळेल आणि मज्जा देखील येईल. अशाने मुलंदेखील चपळ होतात, त्यांना आजूबाजूची माहिती मिळते, अभ्यासातून थोडी विश्रांती देखील मिळते. मुलांना आपण पुस्तकांमधून सर्वकाही शिकवू शकत नाही. त्यांना हुशार आणि अॅक्टिव्ह बनवण्यासाठी अशा ऐतिहासिक, सांस्कृतिक, माहितीपूर्वक ठिकाणी घेऊन जाणे गरजेचे आहे. मुलं जेव्हा नवीन गोष्टी पाहतात तेव्हा त्यांना अधिक गोष्टी समजतात. तसेच लहान मुलांना प्राणी खूप आवडतात. त्यामुळे प्रत्येक मुलाला एकदातरी प्राणी संग्रहालयात जायची इच्छा असते. जर तुम्ही तुमच्या मुलांसह नॅशनल पार्कला जात असाल तर या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

सुरक्षितता 

मुलांची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी जाताना, मुलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्या. अशा ठिकाणी बऱ्याचदा मुलांना आरामदायी आणि सुरक्षित कपडे आणि बूट घाला. नेहमी आपल्याजवळ प्रथमोपचारचा बॉक्स ठेवा.

हवामानाचा अंदाज 

पार्कला जाण्यापूर्वी हवामानाची माहिती घ्या. त्या ठिकाणी वातावरण कसं आहे, याबद्दल जाणून घ्या. हवामानाप्रमाणे तुमचा जाण्याचा निर्णय पक्का करा. आणि त्यानुसार तयारी करा. उन्हाळयात जाणार असाल तर टोपी, सनस्क्रीन आणि पुरेसे पाणी सोबत घ्या.

पाण्याची व्यवस्था

बऱ्याचवेळा पार्कमध्ये पाण्याची सोय उपलब्ध नसते. मुलांना लवकर तहान लागते. त्यामुळे पार्कला जाताना भरपूर पाण्याच्या बदल्या सोबत ठेवा,

खाण्याचे पदार्थ

मुलांसाठी हलके आणि पोषक आहार घ्या. जसे फळं, सॅंडविचेस, स्नॅक्स.

निसर्गाबद्दल शिक्षण

नॅशनल पार्कमध्ये बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत, वनस्पती, प्राणी, पक्षी याबद्दल मुलांना माहिती द्या. त्यांना निसर्गाचे महत्त्व समजावून सांगा आणि निसर्गाची काळजी कशी घ्यावी हे शिकवा.

नियम

पार्कमधील नियमांचे पालन करा . पालकांनी मुलांना कचरा न टाकण्याची आणि प्राण्यांना त्रास न देण्याची शिकवण द्या.

हेही वाचा : These Trees Gives More oxygen : ही झाडे आहेत ऑक्सिजनचा खजिना !


Edited By : Prachi Manjrekar

 

Manini