Saturday, March 22, 2025
HomeमानिनीFashion Tips : नोज रिंग घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

Fashion Tips : नोज रिंग घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

Subscribe

बऱ्याच लोकांना आपल्या लूकमध्ये एक्सपेरिमेंट करायला खूप आवडत त्यासाठी ते विविध प्रकारच्या अॅक्सेसरीज ट्राय करत असतात.  हल्ली नोज रिंग खूप ट्रेंडमध्ये आहे हा आता फॅशनचा एक भाग झाला आहे. ही फॅशन तरुणींमध्ये खूप लोकप्रिय आहे. या नोज रिंगमुळे आपला लूक सुंदर आणि आकर्षक तर दिसतोच परंतु यामध्ये तुम्हाला असंख्य प्रकार देखील मिळतील. तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वानुसार या नोज रिंगची निवड करू शकता. परंतु नोज रिंग घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. जेणेकरून तुमचा लुक आकर्षक तर दिसेलच, पण तुम्हाला कोणत्याही अडचणी देखील येणार नाही.

मटेरियलवर फोक्स करा

नोज रिंग खरेदी करताना तुम्ही त्याच्या मटेरियलवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हल्ली सोने, चांदी, टायटॅनियम इत्यादी अनेक प्रकारच्या मटेरियलमध्ये नोज रिंग उपलब्ध आहेत.जर तुमची त्वचा संवेदनशील असेल किंवा तुम्हाला ऍलर्जी असेल तर टायटॅनियम किंवा सर्जिकल स्टील यांसारख्या नोज रिंगची निवड करा. यामुळे तुम्हाला क्लासिक लूक मिळेल.

डिझाइन

नोज रिंग खरेदी करताना त्याची शैली आणि डिझाइन खूप महत्त्वाची असते. नोज रिंग्जमध्ये स्टाइल आणि पर्यायांची कमतरता नाही. तुम्ही हुप्सपासून ते सेप्टम इत्यादी रिंग्जशी निवडू करू शकता. म्हणून, नोज रिंग खरेदी करताना, तुमच्या वैयक्तिक शैलीकडे आणि प्रसंगाकडे विशेष लक्ष द्या. स्टडस् नोज रिंग हे मिनिमलिस्ट लूकसाठी परिपूर्ण आहेत. तर हूप्स किंवा सेप्टम रिंग्ज तुमच्या पोशाखात काही चमक आणू शकतात.

नोज रिंगच्या साइजकडे दुर्लक्ष करू नका

अनेकदा जेव्हा आपण नोज रिंग खरेदी करतो तेव्हा आपण त्याचा आकार आणि फिटिंगकडे दुर्लक्ष करतो. तर याकडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे. जर तुम्हाला खात्री नसेल, तर योग्य मोजमापांसाठी व्यावसायिक पियर्सरचा विचार करणे योग्य ठरेल. जर तुम्ही पहिल्यांदाच नाक टोचत असाल. तर जास्त घट्ट किंवा खूप सैल नोज रिंगची निवड करू नका.

रंग

नोज रिंग खरेदी करताना, तुम्ही त्याच्या रंगाकडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे.हल्ली सोन्यापासून ते चांदीपर्यंत, गुलाबी सोन्याचे आणि अगदी ऑक्सिडाइज्ड नोज रिंग्ज बाजारात उपलब्ध आहेत. हे सर्व खूपच फॅशनेबल दिसतात. पण प्रत्येक प्रकारच्या नोज रिंग प्रत्येकाला चांगल्या वाटत नाहीत, म्हणून आधी तुमच्या स्किन टोनशी काय जुळते किंवा तुमच्या लूकशी काय चांगले जुळते याचा विचार करा. अशा प्रकारे तुम्ही तुमचा लूक परिपूर्ण बनवू शकता.

हेही वाचा :  Fashion Tips : बेस्ट ऑक्सिडाइज्ड बांगड्या आणि ज्वेलरी


Edited By : Prachi Manjrekar

Manini