Sunday, April 21, 2024
घरमानिनीरोजच्या धावपळीतून स्वतःला 'असे' ठेवा निरोगी

रोजच्या धावपळीतून स्वतःला ‘असे’ ठेवा निरोगी

Subscribe

धावपळीने भरलेल्या रोजच्या रुटीनला प्रत्येकजण कंटाळला आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या गोष्टीने स्ट्रेसफुल आयुष्य जगत आहे. आयुष्याच्या समस्या सोडवताना अनेकदा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत आहोत तर आरोग्याच्या बाबतीत आपण बेफिकीर राहतोय. पण, प्रत्यक्षात निरोगी राहण्यासाठी योग्य खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायाम आणि निरोगी लाइफस्टाइल याशिवाय इतरही गोष्टी आवश्यक असतात.

जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतो, आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही किंवा खुप जास्त प्रमाणात विचार करतो. तेव्हा याचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होत असतो. यासाठी स्वतःला आनंदी ठेवणे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. निरोगी आयुष्य जगण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

ब्रेक घ्या –
जर तुम्ही रोजच्या धावपळीला कंटाळले असाल तर अशावेळी तुम्हाला ब्रेकची गरज आहे असे समजा. कारण तुमच्या धावपळीच्या रोजच्या रुटीनचा तुमच्या आरोग्यावरही तितकाच परिणाम होत असतो. यासाठी दैनंदिन आयुष्यात ब्रेक गरजेचा आहे. या ब्रेकमध्ये तुम्ही कोणतीही ॲक्टिव्हिटी करू शकता. यात योगासने, वेगाने चालणे, वाचन यासारख्या ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. अशाने तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम व्हायला मदत मिळेल.

स्वतःची काळजी घ्या –
प्रत्येक जण आपल्या प्रियजनांसाठी किंवा कुटूंबियांसाठी मेहनत घेत असतो. मात्र, अशावेळी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, जेव्हा तुम्ही स्वतः निरोगी असाल तेव्हाच तुम्ही आयुष्यात आपल्या प्रियजनांसाठी काहीतरी करू शकाल. यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. निरोगी आहार घ्या, स्वतःबद्दल मनमोकळेपणाने बोला, तुमचे विचार व्यक्त करा, निरोगी लाइफस्टाइल फॉलो करा. याशिवाय शरीरात कोणत्याही प्रकारची समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

- Advertisement -

सोशल ॲक्टिव्हिटी करा –
बऱ्याचदा आपण रोजच्या रुटीनमध्ये इतके गुंतून जातो की, ज्या गोष्टी आयुष्यात महत्वाच्या असतात त्या आपण विसरूनच जातो किंवा त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे कितीही बिझी असाल तरी किमान आठवड्यातून एक तास काढून तुम्ही सोशल ॲक्टिव्हिटी करायला हवी. याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. याशिवाय तुम्ही आउटिंगचा प्लॅन सुद्धा करू शकता. मित्रांना भेटायला जा, बाहेर फिरा किंवा तुम्हाला आवडेल ते करा. याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल.

 

 


हेही वाचा : उन्हाळा सुरु होताच अशी घ्या आरोग्याची काळजी

- Advertisment -

Manini