घरलाईफस्टाईलकिडनी फेल्युअर : मान्सूनचा काळ अधिक चिंताजनक

किडनी फेल्युअर : मान्सूनचा काळ अधिक चिंताजनक

Subscribe

पावसाच्या दिवसात अनेक आजार डोकंवर काढतात. तसेच या मोसमात किडनीला जंतूसंसर्ग होऊ नये व त्यांचे एकूणच आरोग्य राखले जावे यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असते.

शरीराचे कार्य सुरळीत चालू राहण्यामध्ये आपल्या किडन्या म्हणजे मूत्रपिंडे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कारण आपल्या शरीरयंत्रणेसाठी घातक असलेली दूषित द्रव्ये शरीराबाहेर टाकणारे फिल्टर्स म्हणून त्या कार्यरत असतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यामध्ये आणि शरीराचे काम व्यवस्थित सुरू राहण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या तांबड्या पेशींच्या निर्मितीमध्येही त्यांची मदत होत असते. पावसाळ्याचा मोसम उन्हाच्या कडाक्यापासून आपली सुटका करतो आणि सर्वांना आनंद व दिलासा देतो हे खरे असले तरीही तो आपल्याबरोबर संसर्गजन्य आजारही घेऊन येतो हे विसरता कामा नये. या काळात सूक्ष्मजंतूंची वाढ होण्यासाठी पोषक परिस्थिती असते, ज्यातून आपल्या पेशींचे नुकसान होऊ शकते, त्या नष्ट होऊ शकतात.

पावसाळ्याच्या या मोसमामध्ये वेगवेगळ्या आजारांपासून स्वत:चे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. या काळात कितीतरी प्रकारचे आजार वाढीला लागतात. हे आजार होण्यामागे असलेली दोन मुख्य कारणे म्हणजे दूषित पाणी, अन्न आणि डास. शहरात साचणारी डबकी म्हणजे डासांच्या पैदाशीसाठी आदर्श जागा असतात. मलेरिया, लेप्टोस्पायसोसिस, डेंग्यू, टायफॉइड, गंभीर स्वरूपाचा गॅस्ट्रोएंट्रायटीस, हेपटायटिस ए, हेपटायटिस ई ही या काळात होणाऱ्या रोगांची प्रमुख उदाहरणे आहेत, ज्यांच्यामुळे किडन्यांचा दाह होऊ शकतो व त्यातून पुढे किडनी निकामी होऊ शकते.

- Advertisement -

या मोसमात किडनीला जंतूसंसर्ग होऊ नये व त्यांचे एकूणच आरोग्य राखले जावे यासाठी पुढील दक्षता घेता येतील :

  • नकोशा सूक्ष्म जीवजंतूंना दूर ठेवण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवा. जिथे सारखा हात लागत असतो, ज्याचा सारखा वापर होत असतो असे पृष्ठभाग नियमितपणे स्वच्छ करावेत.

  • पिण्याचे पाणी उकळून घ्यावे किंवा फिल्टर करून घ्यावे. पाणी हा जंतूंच्या फैलावासाठी कारणीभूत ठरणारा स्त्रोत आहे. त्यामुळे ते पिण्याआधी ते गाळून किंवा उकळून घेणे चांगले.

    - Advertisement -
  • बाहेर मिळणारे तयार अन्न नेहमीच उत्तम दर्जाचे असेल असे नाही. त्यात दूषित पाण्याचा वापर केला गेलेला असू शकतो किंवा तुमच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या पदार्थांचा त्यात वापर केलेला असू शकतो. तेव्हा आजार दूर ठेवण्यासाठी या दिवसांत घरी शिजवलेले ताजे अन्न खाणेच योग्य.

  • जंतूंचा सर्वाधिक फैलाव हा हातांवाटे होत असतो आणि म्हणूनच हात स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक आहे; विशेषत: खाण्याआधी आणि खाल्लानंतर.

  • आपल्या घरातील विजेच्या उपकरणांमध्येही सूक्ष्म-जीवजंतू असू शकतात आणि म्हणूनच ही उपकरणे वरचेवर स्वच्छ करायला हवीत. यामुळे संसर्गाचा धोका कमी होईल.

  • आधीच कापून ठेवलेल्या फळांमध्येही सूक्ष्म जीवजंतूंची पैदास होण्याचा धोका असतो. त्यामुळे ताजी कापलेली फळेच खाल्ली पाहिजेत. फळे सोलून खाणे अधिक चांगले कारण त्यांच्या सालांवर जंतू असण्याची शक्यता असते.

  • पावसाळ्याच्या ऋतूमध्ये एकदातरी मनसोक्त भिजण्याची, मळके होण्याची इच्छा प्रत्येकालाच होत असते. पण घरी आल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायला विसरू नका. आणि इतरांना स्पर्श करू नका म्हणजे तुमच्या हातांवरील जंतूंचा संसर्ग त्यांना होणार नाही.

  • आपले बूट शक्यतो घराबाहेर काढून ठेवावेत म्हणजे जंतूसंसर्गाचा घरात शिरकाव होणार नाही.

  • आपल्या किडन्यांच्या आरोग्यासाठी शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायला हवी. पावसाळ्यात शरीरामध्ये ग्लुकोजचे प्रमाण खूप वाढल्यास त्यांनी किडन्यांना मोठी हानी पोहोचू शकते.


    – डॉ. अजित कुमार सिंग; नेफ्रोलॉजिस्ट, नेफ्रोप्लस डायलिसिस सेंटर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -