Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Health तुमची मुलं झोपताना घोरतात का? पालकांनो करु नका दुर्लक्ष

तुमची मुलं झोपताना घोरतात का? पालकांनो करु नका दुर्लक्ष

Subscribe

प्रत्येक घरात एखादा व्यक्ती असा असतोच जो झोपल्यानंतर घोरतोच. अशा व्यक्तीमुळे दुसऱ्यांची झोप मोड होते. याकडे बहुतांवेळा दुर्लक्ष सुद्धा केले जाते. पण असे करणे चुकीचे आहे. जर अशा प्रकारची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या. अशातच तुमचे मुलं झोपताना घोरत असेल तर ते हलक्यात घेऊ नका.

घोरण्यामागील कारणं काय?
झोपल्यानंतर घोरणे ही एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे. ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप एप्निया समस्या अशावेळी होते जेव्हा रात्री झोपताना श्वास घेताना हवेच्या वरच्या मार्गात किंवा पूर्णपणे अडथळा निर्माण होतो. यामुळेच घोरण्याची सवय लागते. ही समस्या बहुतांशकरुन मोठ्या व्यक्तींना होते. पण तुमच्या मुलांना ही समस्या झाली असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

- Advertisement -

लहान मुलं ही कमी घोरतात. बहुतांश मुलांमध्ये अशा प्रकारची समस्या 1 ते 10 टक्के होण्याची शक्यता असते. खरंतर मुलांमध्ये 3-12 टक्क्यांपर्यंत घोरण्याची समस्या बाब आहे. परंतु यापेक्षा अधिक समस्या उद्भवत असेल तर मुलाला श्वास घेण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो. यामुळेच त्याची झोप ही पूर्ण होत नाही. या व्यतिरक्त मुलाच्या आरोग्यावर ही गंबीर प्रभाव पडतो.

मुलांमध्ये घोरण्याऐवजी आणखी काही लक्षण असू शकतात. त्याकडे दु्र्लक्ष करणे पालकांना महागात पडू शकते. जसे की, तोंडाने श्वास घेणे, व्यवस्थितीत न झोपणे, रात्री झोपेत वारंवार उठणे असे. अशी समस्या झाल्यास मुलात हायपर अॅक्टिव्ह, चिडचिडेपणा अशा समस्या उद्भवू शकतात. मुलांमध्ये टॉन्सिल्सची समस्या, लठ्ठपणा याच्या लक्षणात ही वाढ होते.

- Advertisement -

ही सवय मुलांच्या ग्रोथ आणि हेल्थ ग्रोथवर ही चुकीचा परिणाम करतात. हा एक गंभीर आजार होऊ शकतो. यावर वेळीच उपचाक करणे फार महत्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास मुलांच्या वागण्याबोलण्यात बदल, लक्ष्य केंद्रित न होणे, शिकण्याची क्षमता कमी होणे याचा धोका निर्माण होऊ शकतो.


हेही वाचा- Parenting Tips: ऑनलाईन जगात दिसतं तसं नसतं, मुलांना सांगा ‘या’ गोष्टी

- Advertisment -

Manini