Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीCleaning Tips : या टिप्सने चुटकीसरशी स्वच्छ होतील किचन टाइल्स

Cleaning Tips : या टिप्सने चुटकीसरशी स्वच्छ होतील किचन टाइल्स

Subscribe

हल्ली तर बऱ्याचजणांच्या स्वयंपाकघरात मार्बल्स टाइल्स असतात. ज्या डाग लागल्यानंतर स्वच्छ करणे थोडे कठीण काम असते. या टाइल्सवरील गॅसच्या धुराचे आणि पदार्थांचे तेलकट डाग सहसा निघत नाही. इतकंच काय आपण हे डाग वेळेत स्वच्छ न केल्यास बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू लागते, जे आरोग्यासाठी हानिकारक असते. अशाने तुमचे घर रोगांचे घर बनू शकते. त्यामुळे किचन टाइल्स वेळेवर स्वच्छ करणे गरजेचे आहे. पण, टाइल्सवरील हट्टी डाग काढणे म्हणजे एक प्रकारची डोकेदुखी असते. त्यामुळे जाणून घेऊयात काही सोप्या टिप्स ज्याच्या साहाय्याने किचन टाइल्सवरील डाग चुटकीसरशी निघतील.

ब्लिच आणि लिंबू –

किचन टाइल्सवरील तेलाचे डाग काढण्यासाठी ब्लिच आणि लिंबाचा वापर करू शकता. यासाठी 1 चमचा ब्लिच घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला. तयार पेस्टने टाइल्स पुसून घ्यावी. फक्त टाइल्स पुसताना ग्लोज घालायला विसरू नका.

- Advertisement -

बेंकिग सोडा –

कोमट पाण्यात 2 चमचे बेंकिग सोडा मिसळून घट्ट पेस्ट तयार करून घ्या. तयार पेस्ट स्क्रबरच्या साहाय्याने टाइल्सवर लावा आणि थोडे घासा. असे केल्याने टाइल्स स्वच्छ होतील आणि बॅक्टेरीया सुद्धा नष्ट होतील.

डिशवॉशर आणि लिंबाचा रस –

लिंबाचा रस, डिश वॉशर कोमट पाण्यात मिक्स करून घ्या. तयार मिश्रणाने टाइल्स पुसून घ्या. या हॅकमुळे टाइल्स स्वच्छ होतील.

- Advertisement -

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर –

किचन टाइल्स स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्यासोबत तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाइल्सवर चोळून घ्या. या उपायाने टाइल्सवरील डाग निघतील.

लिंबू आणि गरम पाणी –

लिंबाच्या साहाय्याने किचन टाइल्सवरील डाग काढता येतात. यासाठी एक कप कोमट पाण्यात त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करा. आता तयार मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि स्क्रबरने घासून घ्या. काही दिवस सतत हा उपाय केल्यास टाइल्सवरील डाग सहजतेने निघतील.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini