An Apple a Day keeps a Doctor Away हे वाक्य तुम्ही लहानपणापासून ऐकत आला असालच. सफरचंद खाल्याने शरीराला अनेक प्रकारे फायदे होतात. सफरदचंद एक आरोग्यादायी फळ आहे, ज्यामध्ये भरपूर पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे सफरचंद रोज खाण्याचा सल्ला दिला जातो. अनेकजण कामावर सफरचंद कापून खाण्यासाठी नेतात. पण, कापलेले सफरचंद काळे पडते. ज्यामुळे खावेसे वाटत नाही. त्यामुळे तुमची हीच समस्या लक्षात घेऊन आम्ही यावर आज काही सोपे उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे कापलेले सफरचंद काळे पडणार नाही.
मधाचे पाणी –
कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यांना मध लावावा. मधामध्ये पेप्टाइड नावाचे कंपाउड असते. हे कंपाऊड संरक्षक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. या कंपाऊडमुळे सफरचंद काळे पडत नाही.
कसे वापराल?
- एक कप पाण्यात 2 चमचे मध मिक्स करा.
- या मधाच्या पाण्यात सफरचंदाचे तुकडे 5 ते 10 मिनिटांसाठी भिजत ठेवा.
- जेव्हा तुम्हाला सफरचंद खायचे असेल तेव्हा पाण्यातून काढून खावू शकता.
लिंबाचा रस –
कापलेल्या सफरचंदाचे तुकडे काळे पडू नयेत यासाठी लिंबाचा रस हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. लिंबाच्या रसामध्ये असणारे घटक ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते. ज्यामुळे सफरचंद काळे पडत नाही.
कसे वापराल?
- सफरचंदाच्या कापलेल्या भागावर लिंबाचा रस लावावा.
- किंवा तुम्ही लिंबाच्या पाण्यात सफरचंदाचे तुकडे देखील ठेवू शकता.
मीठ आणि पाणी –
कापलेल्या सफरचंदाचे तुकडे काळे पडू नयेत यासाठी मीठ आणि पाण्याचा वापर केला जाऊ शकतो.
कसे वापराल ?
- अर्धा चमचा मीठ पाण्यात मिक्स करून घ्या.
- आता तयार मीठाच्या पाण्यात सफरचंदाचे तुकडे 2 ते 4 मिनिटांसाठी भिजत ठेवा.
- खाण्यापूर्वी, सफरचंदाचे तुकडे पाण्याने धुवा, जेणेकरून कापलेल्या सफरचंदाचे तुकडे खारट लागणार नाहीत.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde