Sunday, April 21, 2024
घरमानिनीKitchenKitchen Tips : 10 मानिनी टिप्स

Kitchen Tips : 10 मानिनी टिप्स

Subscribe

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

Swimmers, Improve Your Cooking Game!

- Advertisement -

 

  • लाडू करताना पाकात पाण्याऐवजी दूध वापरले तर खव्यासारखी चव येते.
  • वड्या करताना मिश्रण सैलसर झाल तर परत थोड भिजवून मिल्क पावडर आणि पिठीसाखर घालून वड्या थापाव्या.
  • करंजी, शंकरपाळी या पदार्थांसाठी शक्यतो तुपाचे मोहन वापरावे यामुळे पदार्थ जास्त खुसखुशीत होतात.
  • कांदा भाजताना त्यात किंचीत मीठ घाला यामुळे कांदा लगेच भाजण्यास मदत होते.
  • अनारसे तुपात टाकल्यानंतर विरघळत असतील तर त्या मिश्रणात थोडी तांदळाची पिठी मिसळावी. तसेच अनारसे तळताना जाळी कमी पडल्यास खसखशित थोडी साखर घालून त्यावर अनारसा थापावा. म्हणजे अनारसे चांगले होतात.

14 Faces you make when someone else cooks in your kitchen

- Advertisement -
  • मिक्सरची पाती धारदार ठेवण्याकसाठी महिन्यातून किमान एकदा तरी साधं मीठ ग्राईण्ड करावं.
  • कांदे आणि बटाटे एकत्र साठवू नये नाहीतर बटाटे जास्त काळ चांगले राहत नाहीत.
  • कापलेले सफरचंद लाल होण्यापासून वाचण्यासाठी त्याला किंचीत लिंबाचा रस लावा.
  • घरात किंवा स्वयंपाक घरात मोर पिसे ठेवल्यास पाली नाहीशा होतात.
  • घराच्या कोपऱ्यामध्ये बोरिक पावडर टाकून ठेवल्यास झुरळे निघून जातात.

हेही वाचा :

Kitchen Tips : महिलांसाठी 10 सोप्या मानिनी टिप्स

- Advertisment -

Manini