Sunday, February 25, 2024
घरमानिनीKitchenKitchen Tips : महिलांसाठी 10 स्पेशल मानिनी टीप्स

Kitchen Tips : महिलांसाठी 10 स्पेशल मानिनी टीप्स

Subscribe

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

वर्किंग मदर्स का काम आसान करेंगी ये Cooking Tips, मिनटों में तैयार हो जाएगा खाना - cooking tips for working mothers-mobile

- Advertisement -
  • मेदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात.
  • कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान कुरकुरीत होतात.
  • ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे. वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे. ताक आंबट होत नाही.
  • छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात.
  • ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते. तेव्हा 15-20 शेंगदाण्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी. नंतर कढी करावी. असे केल्यास कडी फाटत नाही. पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा.

Cook Smarter, Not Harder: Nine Time-Saving Cooking Tips – Ask an Expert | USU

  • काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात आणि ते लवकर जात नाहीत. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे.
  • डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ आणि उडीद डाळ (4:1) या प्रमाणात घ्यावी. आणि मऊ डोशासाठी हे प्रमाण (3:1) असे असावे.
  • बटाटे नेहमी सूर्यप्रकाश, पाणी, उष्णता यापासून दूर थंड जागेत ठेवावे. बटाटे नेहमी अंधारा जागेत ठेवावे. त्यामुळे त्यांचा स्वाद आणखी वाढतो.
  • लिंबाच्या रसाचे डाग घालवण्यासाठी त्यावर आल्याचा तुकडा घासावा.
  • पुऱ्यांच्या कणकेत साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात.

हेही वाचा :

Kitchen Tips : रुचकर जेवणासाठी स्पेशल टिप्स

- Advertisment -

Manini