Sunday, February 25, 2024
घरमानिनीKitchenKitchen Tips : गृहिणींसाठी खास 10 टिप्स

Kitchen Tips : गृहिणींसाठी खास 10 टिप्स

Subscribe

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

10 Kitchen Hacks Every Home Cook Should Know - Corrie Cooks

- Advertisement -
  • शिळा ब्रेड कडक उन्हात वाळवून चूरा करून ठेवल्यास कटलेट करताना उपयोगी पडतो.
  • फ्रीजरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्याखाली प्लास्टिक पेपर ठेवा. काढताना ट्रे चटकन निघतो.
  • आपण दररोज ठराविक भांड्यात आपण चहा करतो. त्याला पडलेले चहाचे डाग जात नाहीत. म्हणून ते भांडे घासण्यापूर्वी मिठाने चोळल्यास ते डाग चटकन जातात.
  • पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सर मधून वाटून मग फोडणीला टाकला तर त्याचा हिरवा रंग कायम राहतो.
  • जर हाताला मच्छी किंवा कांद्याचा वास येत असेल तर चणा डाळीचे (बेसन) पीठ चोळावे आणि साबण लावून हात धुतल्यानंतर वास जातो.

Become a Better Cook Today: 20 Ways to Improve Your Cooking Skills

  • ताक आंबट असल्यास त्यात अर्धा कप दूध घालून ठेवावे. आंबटपणा कमी होईल.
  • ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हात चण्याचे, तांदुळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे. यामुळे लोणी हाताला अजिबात चिकटून राहत नाही.
  • ड्राय फ्रूट्स कापायचे असतील तर ते आधी एक तास फ्रीजमध्ये ठेवा, नंतर त्याना गरम पाण्यात बुडवलेल्या सुरीने कापा म्हणजे लवकर कापले जातात.
  • कोबी शिजवताना त्यात थोडेसे व्हिनेगर घातले तर शुभ्र रंग कायम राहतो.
  • कधी कधी तुरीची डाळ कूकरमध्येही शिजत नाही म्हणून त्यात एक चिमुटभर मीठ, थोडेसे तेल, थोडीशी हळद , हिंग पूड घालून कुकरमध्ये शिजवली तर डाळ नीट शिजते आणि स्वादही छान येतो.

हेही वाचा :

Kitchen Tips : महिलांसाठी 10 झटपट टिप्स

- Advertisment -

Manini