घरलाईफस्टाईलस्वयंपाक घरातील खास टिप्स

स्वयंपाक घरातील खास टिप्स

Subscribe

जाणून घ्या झटपट किचन टिप्स

  • कोबीची भाजी उरली असेल आणि परत ती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ती गॅसवर परतून घेऊन त्यात डाळीचं पिठ १-२ चमचे घालून परतून घ्या आणि नेहमीप्रमाणे कणिक मळून कणकेत हे सारण स्टफ करून कोबीचे स्टफ्ड पराठे बनवा.
  • कोणत्याही पाककृतीत पनीर वापरायचे असल्यास, पनीरचे क्यूब्ज करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्ज १०-१५ मिनिटे ठेवा. मग एका चाळणीत ५ मिनिटे पनीर निथळत ठेवा. आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डीशमध्ये वापरण्यासाठी तयार.
  • कोणताही पुलाव, जिरा राइस किंवा स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तेव्हा, तांदळाच्या दीडपट पाणी घालावे आणि २ शिट्ट्या कराव्यात. भात मोकळा आणि फडफडीत होतो.
  • गरमागरम इडली, इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे. यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात.
  • काही भाज्या, उसळी किंवा भात करताना तयार मसाले फोडणीत टाकले की चांगला स्वाद येतो. अशावेळी हे मसाले डायरेक्ट फोडणीत टाकले तर ते करपतात. त्याऐवजी १ चमचाभर तेलात थोडा मसाला (पूड) घालून मग ते तेल फोडणीमध्ये घातले तर मसाले करपत नाहीत आणि मसाल्याचा स्वादही पदार्थात चांगला उतरतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -