Kitchen Utensils: Ceramic क्रॉकरीवरील तेलकट डाग कसे घालवायचे ?

आपण सगळेजण घरात स्टील,तांबे,लाकडी किंवा लोखंडाची भांडी वापरतो. अशातच या भांड्यांना आपण साबण,डिश वॉश या सर्वानी धुवून घेतो. पण घरामध्ये अशी काही भांडी असतात ज्यांना धुण्यासाठी वेगळ्या प्रकारे त्याची काळजी घ्यावी लागते. सिरॅमिक क्रॉकरीपासून बनवलेल्या भांड्याची विशेष काळजी घ्यावी लागते. तर आता आपण जाणून घेऊया  सिरॅमिक क्रॉकरीपासून बनवलेल्या भांड्याचे चिकट तेल स्वच्छ करण्यासाठी कोणत्या सोप्या टिप्स आहेत.

Animal-bone Free Crockery - Vegan India!

1. बेकिंग सोडा वापरा-

सिरॅमिक क्रॉकरीच्या भांड्यातील तेलकट आणि चिकट डाग हे लवकर जात नाहीत. तसेच या भांड्यातील तेल हे बेकिंग सोड्याच्या मदतीने सहजपणे स्वच्छ केले जाऊ शकतात. या टिप्स करा फॉलो-

 • सर्व प्रथम, एका मोठ्या भांड्यात 1-2 लिटर पाणी घाला.
 • आता पाण्यात 2-3 चमचे बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करा.
 • यानंतर, मिश्रणात भांडे घाला आणि सुमारे 5-7 मिनिटे सोडा.
 • 5 मिनिटांनंतर, भांडी स्क्रबने घासून स्वच्छ करा.

Here's the Best Way to Clean Your Dishes - Freshclean

2. लिंबाचा रस वापरा-

सिरॅमिक क्रॉकरीवर चिकटलेल्या तेलाचे किंवा फोडणीचे चिकट आणि तेलकट डाग काढून टाकण्यासाठी लिंबाचा रस वापरा. लिंबाचा वापर केल्याने सिरॅमिक क्रॉकरीवरील भाज्या किंवा मसाल्यांच्या डाग सहज साफ होतील. या टिप्स फॉलो करा-

 • सर्व प्रथम, एका भांड्यात 1-2 लिटर पाणी घाला.
 • आता पाण्यात 3-4 चमचे लिंबाचा रस आणि 1 चमचे मीठ घालून चांगले मिसळा.
 • यानंतर, मिश्रण थोडे कोमट करा आणि भांडे पाण्यात टाका आणि सुमारे 5 मिनिटे सोडा.
 • जेव्हा पाणी थंड होते तेव्हा सिरॅमिक क्रॉकरी क्लिनिंग ब्रशने घासून स्वच्छ करा.

How to Hand Wash Dishes - Cleaning & Sanitizing Dishes By Hand | Apartment Therapy

3. व्हिनेगर वापरा-

व्हिनेगर हा द्रव्य पदार्थ लगेचच डाग काढण्यास फायदेशीर ठरतो. व्हिनेगरचा वापर सिरॅमिकच्या भांड्यांसाठी अतिशय चांगला असून, भांडी घासताना जास्त कष्ट पडत नाही.

 • सर्व प्रथम, 2 कप पाण्यात 2-3 चमचे व्हिनेगर घाला आणि चांगले मिसळा.
 • त्यानंतर हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून घ्या .
 • आता हे मिश्रण सिरॅमिक क्रॉकरीवर शिंपडा आणि काही वेळ राहू द्या.
 • काही वेळाने क्लिनिंग ब्रशने घासून स्वच्छ करा.

Do You Need To Wash Your Hands After Washing The Dishes?

अशाप्रकारे सिरॅमिक भांड्यांसाठी अमोनिया पावडर किंवा ब्लीच पावडर देखील वापरू शकता. अशा पद्धतीने सिरॅमिक क्रॉकरीपासून बनवलेल्या भांड्याची अशी काळजी घेतली तर ही भांडी लवकर खराब होणार नाहीत आणि दिसायला सुद्धा छान दिसतील.


हेही वाचा : 

AI सांगणार तुमच्या किचनमध्ये काय काय संपलय!