घरलाईफस्टाईलगृहिणींसाठी खास किचन टीप्स

गृहिणींसाठी खास किचन टीप्स

Subscribe

स्वयंपाकासाठी काही खास टिप्स

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • चहा करताना किसलेले आले शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहाला अधिक लागतो.
  • इडली, डोसा आणि आप्पे करताना तांदूळ आणि उडीद डाळ यांच्यासोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवा. यामुळे पोषणमूल्य वाढते.
  • अननसाचा शिरा करताना त्याचे तुकडे साखरेत शिजवून मग शिऱ्यात घाला. त्यामुळे आंबटपणा येत नाही. शिवाय इसेन्सही घाला.
  • कणिक भिजवताना अर्ध पाणी आणि अर्ध दूध घातल्यास पोळ्या मऊ आणि चविष्ट होतात. तसेच रंग चांगला येतो.
  • पुऱ्या करताना पिठात दोन चमचे बेसन घातल्यास पुऱ्यांना रंग छान येतो आणि चांगली चवही येते.
  • नासलेल्या पोळ्यांना कुकरमध्ये १ – २ शिट्टया देऊन उकडून घ्याव्यात आणि तेलाने तव्यावर कडक भाजून घ्याव्या अशा पोळया रूचकर आणि नरम लागतात यास खाण्यासाठी आरामात वापरू शकता.
  • जर तुम्हाला नारळाचे समान दोन भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे आणि नंतर जोराने आपटावे, नारळ तेथूनच तुटेल याची खात्री आहे.
  • तांदुळ शिजवताना कुकरमध्ये १ चमचा लिंबू रस घातल्यास भात मोकळा होतो.
  • टमाटरचा पल्प काढण्यासाठी कुकरमध्ये मीठ आणि पाण्यात उकळावे त्यानंतर त्याची साल पटकन काढता येते. याचा उपयोग टमाटर सूप, ग्रेवी आणि ज्यूससाठी करता येतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -