Thursday, April 25, 2024
घरमानिनीKitchenकिचनमध्ये रद्दी पेपरचा करा असा उपयोग

किचनमध्ये रद्दी पेपरचा करा असा उपयोग

Subscribe

न्युजपेपर वाचल्यानंतर ते काही कामाचे राहत नाहीत असे बहुतांशजणांना वाटते. तसेच न्युजपेपर खुप जमा झाल्यानंतर ते आपण रद्दीत टाकतो. अशातच जुने पेपर ठेवून काय फायदा असे त्यावेळी वाटते. परंतु तुम्ही त्याच्या किचनच्या कामांमध्ये वापर करु शकता याचा कधी विचार केलाय का? (Newspaper use for kitchen use)

सर्वसामान्यपणे जुने न्युजपेपर अधिकाधिक कॅबिनेटच्या रॅकसाठी वापरतो. जेणेकरुन डागांपासून दूर राहण्यास मदत करतात. परंतु तुम्हाला माहितेय का की, या व्यतिरिक्त याचा वापर कशा पद्धतीने केला जातो.

- Advertisement -

पालेभाज्या स्टोर करण्यासाठी
पालेभाज्या किंवा पानांच्या भाज्या जसे पुदीना, कोथिंबिर, पालक आणल्यानंतर ते काही वेळाने खराब होऊ लागतात. अशातच ते दीर्घकाळ फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही जुन्या न्युजपेपरचा वापर करु शकता. यासाठी त्याची पानं स्वच्छ धुवून घ्या. असे केल्यानंतर ते थोडावेळ वाऱ्यावर सुकवा आणि नंतर पेपरमध्ये बांधून ठेवा किंवा फ्रिजमध्ये ठेवा.

- Advertisement -

फ्रिजमधील दुर्गंधी हटवण्यासाठी
फ्रिजमध्ये कापलेल्या भाज्या ठेवणे किंवा एखादा पदार्थ पडल्यानंतर वास येऊ लागतोय. अशातच तेथे स्वच्छता केली नाही तर अधिक दुर्गंधी येते. लगेच स्वच्छता करण्यासाठी तुम्ही न्युजपेपरचा वापर करु शकता.

यासाठी तुम्ही एका वाटीत 2 ग्लास पाण्यात गोड सोडा मिक्स करुन त्याचे मिश्रण तयार करा. आता न्युज पेपरचे लहान लहान तुकडे करुन यामध्ये भिजवा. या भिजवलेल्या मिश्रणाचे गोल बॉल तयार करा आणि ते फ्रिजच्या प्रत्येक कॅबिनेटच्या कोपऱ्यात ठेवाय. असे केल्याने फ्रिजमधून येणारी दुर्गंधी दूर होईल.

मायक्रोवेवचा डोर स्वच्छ करण्यासाठी
माइक्रोवेवचा डोर स्वच्छ करण्यासाठी आपण विविध पर्याय वापरतो. कधीकधी स्वच्छ करुन सुद्धा तो चिकट राहते. अशातच तुम्ही न्युजरपेपरने तो स्वच्छ करु शकता. यासाठी डोरवर विनेगर आणि पाण्याचे मिश्रण तयार करुन घ्या आणि ते स्प्रे करा. आता तो स्प्रे न्युजपेपरने स्वच्छ करा.(Newspaper use for kitchen use)

काचेची विंडो स्वच्छ करण्यासाठी
जर तुमच्या घरी काचेची विंडो असेल तर त्याच्या स्वच्छतेसाठी न्युजपेपरची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही पाण्यात थोडं विनेगर घेऊन विंडोवर स्प्रे करा. आता न्युजपेपरच्या मदतीने स्वच्छ करा.

फ्राइड फूडमधील ऑइल कमी करण्यासाठी
तळलेल्या पदार्थांमध्ये तेल खुप राहते. अशातच त्यामधील तेल काढण्यासाठी तुम्ही टिश्यू पेपर नव्हे तर न्युजपेपरचा वापर करु शकता. यावेळी फ्राय केल्यानंतर पदार्थ लगेच न्यूजपेपरवर ठेवा.


हेही वाचा- किचनमध्ये काम करता? मग हे ‘हॅक्स’ तुम्हांला माहित असायलाच हवेत

- Advertisment -

Manini