स्वयंपाकघरात अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.
- लसणाची साल लवकर निघण्यासाठी लसणाच्या गड्ड्याला थोडा गोड्या तेलाचा हात लावावा.
- खारकेची पूड लवकर होण्यासाठी खारीक व खोबरे एकत्र मिक्सरमध्ये बारिक करावे.
- वेलदोड्याची पूड करताना वेलदोड्याच्या दाण्याबरोबर थोडी साखर टाकावी आणि पूड बारीक होण्यासाठी बेलदोडे थोडे गरम करून घ्यावेत.
- मीठ मिरच्यांचा खरडा काही वेळाने काळा पडतो, त्यासाठी खरडा करतानाच थोडा लिंबू पिळावा. त्यामुळे रंग हिरवागारच राहील.
- पराठ्यांसाठी पीठ भिजवताना कणकेत दोन चमचे मैदा घातल्यास पराठे खुसखुशीत होतात.
- कोफ्त्यासाठी कच्ची केळी वापरल्यास कोफ्ते एकदम पटकन चांगले कुरकुरीत होतात आणि ते जास्त तेल पण शोषून घेत नाहीत.
- मूळा किसून झाल्यावर जे पाणी सुटते ते टाकून न देता आमटीला घालावे स्वाद चांगला येतो.
- किसणीवर गूळ किसताना किसणीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा गूळ चिकटत नाही.
- गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडे डाळीचे पीठ मिसळल्यास पोळी भाजताना गूळ वितळून पोळीबाहेर येत नाही व पोळ्याही खुसखुशीत होतात.
- पुरणपोळीचे पुरण सैल झाल्यास थोडा वेळ सूती राजापुरी पंचावर पसरून ठेवावे.
हेही वाचा :