स्वयंपाक घरात जेवण बनवण्यासोबत काही साध्या-सोप्या टीप्स देखील गरजेच्या असतात. ज्या जेवन करताना खूप उपयोगी येतात. ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
स्वयंपाक करताना वापरा टिप्स
- Advertisement -
- कोबीची भाजी करताना, चिरून झाल्यावर त्याला धुवून मीठ लावून ठेवावे. त्यामुळे कोबी चटकन शिजतो आणि उग्र वास येत नाही.
- उकडलेले बटाटे सोलताना सालासकट त्याचे चार तुकडे सुरीने करा. गडबडीच्या वेळेस बटाटे लवकर थंड होऊन सोलले जातील.
- टोमॅटो कापताना सुरीला किंवा विळीला तेल लावल्यावर भराभर कापला जातो. बारीक फोडी हव्या असतील तर आतील बाजूने कापावा.
- सॅलेडच्या भाज्या चिरताना बर्फाच्या पाण्यात घालून ठेवा. म्हणजे भाज्या ताज्या राहतील.
- अळूची पातळ भाजी करताना पानांचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावेत म्हणजे भाजी चांगली होते.
- गाजराच्या कोशिंबिरीत दोन-तीन मिरच्या तळून चुरा करून घालाव्यात. याने कोशिंबिरीची चव वाढते.
- काही अळूच्या पानांमुळे हातासा खाज येते, अशावेळी ती पाने धुवावीत नंतर एका पसरट भांड्यात पाणी घेऊन त्यात लिंबू पिळावे. 10-15 मिनिटे तसेच ठेवावे. अळूची पाने चाळणीत निथळून घ्यावीत म्हणजे खाज कमी होईल.
हेही वाचा :