Thursday, February 22, 2024
घरमानिनीKitchenKitchen Tips : 'या' हटके टिप्सने जेवण होईल चवदार

Kitchen Tips : ‘या’ हटके टिप्सने जेवण होईल चवदार

Subscribe

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही हटके टिप्स सांगणार आहोत.

How To Be A More Efficient Cook - TrendsCatchers.co.uk

- Advertisement -
  • वालाची उसळ किंवा भाजी करताना डाळ पूर्ण आणि नीट शिजल्यावरच उसळीत मीठ आणि गूळ टाकावा. अन्यथा डाळी नीट शिजत नाहीत, दाणे टचटचीत राहतात.
  • पालेभाज्या, कोथिंबीर नीट निवडून पेपरमध्ये गुंडाळून मग प्लॅस्टीकच्या डब्यात किंवा कॅरीबॅगेत घालून फ्रिजमध्ये ठेवाव्यात. प्रत्येक वेळी बाहेर काढल्यानंतर डबा पुसून कोरडा करावा. यामुळे भाज्या बरेच दिवस ताज्या राहतात.
  • मेथीला आलेले मोड वेगवेगळ्या पदार्थांत वापरल्यास कडू लागत नाही. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. तसेच यामुळे मधुमेह नियंत्रणात राहते, कोलेस्टेरॉल कमी होते आणि पचनास मदत होते.
  • कुठल्याही पालेभाज्या शिजवण्यापूर्वी त्यांत चिमूटभर मीठ टाकले आणि दोन थेंब लिंबाचा रस टाकला तर त्या छान हिरव्यागार राहातात.

kitchen tips - जब हो जाये cooking में mistake तो ऐसे करें सुधार - Aavaz

  • हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप याची हमखास साथ येते. अशावेळी पाणी नेहमी उकळून प्यावे. तसेच अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा मध असे मिश्रण दिवसातून 2-3 वेळा घ्यावे. यामुळे लवकर आराम पडतो.
  • डोसा कुरकुरीत होण्यासाठी डोशाचे पीठ भिजवताना तांदळात 1 चमचा साबुदाणा आणि एक चमचा चण्याची डाळ आणि थोडेसे मेथीचे दाणे घालावेत म्हणजे डोसे कुरकुरीत होतात.
  • इडलीसाठी पीठ भिजवताना तांदळात थोडे मेथीचे दाणे घालावे म्हणजे इडली छान मऊ होईल.

10 Plant Forward Cookbooks that Make Greener Eating Easier – Food Tank

- Advertisement -
  • साबुदाण्याची खिचडी करताना साबुदाणा भिजवायच्या आधी छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा. गार झाल्यावर मग भिजवून ठेवावा. तो नेहमीपेक्षा लवकर भिजतो आणि खिचडीपण मऊ, मोकळी होते.
  • चीज किसताना किसणीला थोडे तेल लावावे. त्यामुळे चीज किसणीला न चिकटता छान किसले जाते.
  • कुकरची रबरी रींग फ्रिजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रिजरमधे 15 मिनिटे ठेवावी, यामुळे रींग लवकर खराब होत नाही आणि कुकरचे प्रेशरही चांगले राहते.

 


हेही वाचा : 

Kitchen Tips : किचनमधील हटके टीप्स

- Advertisment -

Manini