Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल Kitchen Tips: फ्रिजविना 'हे' पदार्थ फ्रेश कसे ठेवायचे

Kitchen Tips: फ्रिजविना ‘हे’ पदार्थ फ्रेश कसे ठेवायचे

Subscribe

उन्हाळ्याच्या दिवसात फ्रिज घरातील एक अविभाज्य घटक बनतो.फ्रिजमधे आपण खूप दिवसांसाठी देखील एखादा अन्नपदार्थ सुरक्षित ठेवू शकतो.परंतु कधी कधी विजेच्या समस्येमुळे किंवा फ्रिज बंद पडल्यामुळे फ्रिजमधील अन्नपदार्थ खराब होऊ लागतात आणि त्यामध्ये बॅक्टरीयाच प्रमाण वाढीस लागत . जर तुम्ही सुद्धा अश्या समस्येचा सामना करत असाल तर काळजी करू नका. आपण असे काही उपाय करू शकतो ज्यामुळे आपण नैसर्गिकरित्या आपण अन्नपदार्थ सुरक्षित ठेवू शकतो.चला तर मग जाणून घेऊया असे काही साधे सोपे उपाय :

बटर आणि जॅम:

- Advertisement -


बाजारातून आणलेले बटर आणि जॅम घरी आणताच फ्रिज मध्ये नाही ठेवले तर काही दिवसात खराब व्हायला लागतात.परंतु आपण जर या पदार्थांच्या बाटल्या थंड पाण्यामध्ये ठेवल्या तर मात्र हे पदार्थ जास्त काळ फ्रिज बाहेर सुद्धा सुरक्षित राहू शकतात.

दूध:

- Advertisement -


दही सोबत दूध सुद्धा खूप लवकर खराब होत.आणि म्हणूनच आपण दूध दोनदा उकळून थंड करून ठेवू शकता. किंवा कच्च दूध थंड पाण्यामध्ये ठेवू शकता.

अंडी:


अंडी ही उन्हाळ्यात लवकर खराब होतात. खासकरुन उकडलेली अंडी. अशातच ती सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना पाण्यात बुडवून ठेवू शकता. कच्ची अंडी तुम्ही फ्रिज नसेल तर थंड ठिकाणी स्टोर करुन ठेवू शकता.

दही:


अन्य खाद्यपदार्थांच्या तुलनेत दही लवकर खराब होते. एक ते दोन दिवसानंतर यामध्ये बॅक्टेरिया वाढू लागते. अशातच दही सुरक्षित ठेवण्यासाठी तु्म्ही काही टीप्स वापरु शकता. त्यासाठी सर्वातप्रथम थंड पाण्यात तुम्ही ते स्टोर करु शकता. दुसरे म्हणजे मधाचा वापर करुन दही सुरक्षित ठेवू शकता. यासाठी तुम्ही दह्यात एक ते दोन चमचे मध टाका. यामुळे दही खराब होणार नाही.

चिकन आणि मासे:


काही वेळेस असे होते की, चिकन किंवा मासे आपण घरी आणतो. पण ते त्याच दिवशी करत नाही. अशातच ते खराब होऊ नये म्हणून त्यावर हळद आणि मीठ लावून ठेवावे. असे केल्यानंतर ते थंड ठिकाणी ठेवा.


हेही वाचा-Food Tips : सोप्या पद्धतीने बनवा तांदळाच्या शेवया व नारळाचा रस

- Advertisment -