गृहीणींना रोजचा स्वयंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे हा प्रश्न पडतो. अशा गृहीणींनकरता स्वयंपाक घरातील चमत्कारी किचन टीप्स
- डाळ शिजवताना त्यात हळदीची पावडर आणि त्यायृत शेंगदाण्याच्या तेलाचे काही थेंब टाका. यामुळे डाळ पटकन शिजते आणि एक वेगळा स्वाद पण येतो.
- बदाम जर १० ते १५ मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवल्यास बदामाची साले चटकन निघण्यास मदत होते.
- लसूणच्या पाकळ्या थोड्या गरम केल्यास त्याची साले पटकन निघतात.
- जास्त लिंबाच्या रसासाठी लिंबू कोमट पाण्यात भिजवावे.
- सुक खोबर तुरडाळीत ठेवल तर खोबर खराब होत नाही.
- तांदूळ पाण्यात भिजवून ठेवल्यास तांदळाचा दाणा मोठा आणि मोकळा होतो.
- बटाटे झटपट उकडण्याकरता बटाट्यामध्ये चिमुटभर हळद घालावी.
- तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा स्वाद टिकून राहतो.
- डाळ किंवा तांदळामध्ये कडूनिंब घातल्यास त्याला किड लागत नाही.
- भाज्यांमध्ये शेवटी मीठ घातल्यास भाजीतलं लोह टिकून राहते.