बाजारात वर्षभर किवी फळ उपलब्ध असते. किवीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, फायबर यासारखी विविध पोषक घटक आढळतात, त्यामुळे किवी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. किवीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असल्याने वेटलॉससाठी किवी खाणे उपयुक्त ठरते. किवी केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. किवीमध्ये आढळणारी पोषकतत्वे त्वचेच्या समस्या कमी करून त्वचा मऊ, मुलायम आणि तेजस्वी बनवतात. तुम्हाला जर पार्लसारखा ग्लो घरी आणायचा असेल तर किवी फेसमास्क वापरायला हवा.
किवी आणि दही फेसमास्क –
किवी आणि दह्याचा फेसमास्क त्वचा उजळण्यास आणि त्वचेवरील डार्क स्पॉट कमी करण्यासाठी वापरायला हवा. किवीमध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे त्वचा उजळते आणि दह्यामुळे त्वचा सॉफ्ट होते.
फेसमास्क बनवण्याची पद्धत –
- किवी आणि दह्याचा फेसमास्क बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये 2 चमचे दही आणि 1 चमचा किवीचा गर घ्यावा.
- दोन्ही गोष्टी व्यवस्थितपणे एकजीव करून घ्याव्यात.
- तयार मिश्रण चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावून ठेवावा.
- 10 ते 15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा.
किवी आणि बदामाचा फेसमास्क –
कोरड्या त्वचेच्या समस्या असतील तर किवी आणि बदामाचा फेसमास्क वापरायला हवा. या फेसमास्कमुळे त्वचा हायड्रेट राहते आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी होतात.
फेसमास्क बनवण्याची पद्धत –
- किवीचा गर आणि 3 बदाम एकत्र करून त्यांची पेस्ट बनवून घ्यावी.
- तयार पेस्टमध्ये 1 चमचा बेसन मिक्स करा.
- तयार फेसमास्क 10 मिनिटे चेहऱ्यावर लावावा.
- 10 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा.
किवी आणि केळ्याचा फेसमास्क –
निस्तेज आणि रुक्ष त्वचेसाठी किवी आणि केळ्याचा फेसमास्क तुम्ही वापरू शकता. केळ्यामुळे त्वचा मॉइश्चराइज होते आणि किवीमुळे चेहरा उजळतो.
फेसमास्क बनवण्याची पद्धत –
- अर्ध केळं आणि 2 चमचे किवीचा गर आणि 1 चमचा दही घ्यावे.
- तयार फेसमास्क चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून ठेवा.
- 15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा.
अशा प्रकारे तुम्ही किवीपासून तयार होणाऱ्या फेसमास्कपासून पार्लरसारखा ग्लो घरच्या घरी आणू शकता. फक्त जर तुमची त्वचा सेंनसिटिव्ह असेल तर फेसमास्क चेहऱ्यावर वापरण्याआधी पॅच टेस्ट नक्की करावी.
हेही पाहा –