घरलाईफस्टाईलCold Water Benefits: बर्फाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास होणार 'हे' फायदे

Cold Water Benefits: बर्फाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास होणार ‘हे’ फायदे

Subscribe

निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. थंड पाण्याने आपला चेहरा धुतल्याने आपल्या त्वचेचा पोत सुधारतो. थंड पाण्यामुळे आपल्या त्वचेवरील पोर्स त्वचेला आकुंचित करतात. यामुळे, आपला रक्त प्रवाह वाढून, अँटी एजिंग अर्थात त्वचेच्या वृद्धत्वाच्या प्रक्रियेची गती कमी होते. ज्यामुळे आपला चेहरा कायम चमकदार राहतो. तसेच आपल्या त्वचेनुसार योग्य क्लींझर निवडणे देखील महत्त्वाचे आहे. याशिवाय बरेच जण चेहरा गरम पाण्याने धुण्याची चूक करतात, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला खूप नुकसान पोहोचते. गरम पाणी चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल काढून टाकते, ज्यामुळे त्वचा कोरडी होते. त्याच वेळी, थंड पाणी त्वचेला अनेक फायदे आणते. जर तुम्हाला आतापर्यंत थंड पाण्याने त्वचा धुण्याच्या फायद्यांविषयी माहिती नसेल, तर जाणून घ्या फायदे

चेहऱ्याची सूज कमी होते

रात्रभर आपल्या चेहऱ्यावर तेल जमा होते. चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा. जर तुमचा चेहरा देखील सकाळी सुजलेला असेल तर तुम्ही तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवा. थंड पाणी त्वचेखाली रक्त प्रवाह कमी करण्यास मदत करते.

- Advertisement -

त्वचा ओलावा वाढवते

थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेला आवश्यक असणारी आर्द्रता आणि लवचिकता कायम राहते. थंड पाण्याने चेहरा धुतल्यास किंवा आंघोळ केल्यास शरीरातील थकवा निघून जातो.

त्वचेचे छिद्रे स्वच्छ होतात

थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेच्या छिद्रांमधील घाण बाहेर फेकली जाते. तसेच रात्री झोपून उठल्यानंतर आपला चेहरा सूजलेला दिसतो. थंड पाण्यामुळे आपल्या त्वचेमधील ओलावा टिकून राहण्यास मदत मिळते. सोबत चेहऱ्यावर ग्लो देखील येतो.

- Advertisement -

त्वचेची जळजळ कमी होते

जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे असतील तर तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुतल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो. यामुळे चेहऱ्यावरील जळजळ किंवा सूज लक्षणीयरीत्या कमी होते.

टॅनिंग कमी होईल

जर तुमचा चेहरा उन्हामुळे टॅन झाला असेल तर आपण सतत थंड पाण्याने तोंड धुतल्याने टॅनिंग कमी होण्यास मदत होईल. थंड पाणी आपल्या चेहऱ्याला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून देखील वाचवते. थंड पाणी हळूहळू तुमच्या उन्हाने बाधित त्वचेला मृत पेशींमध्ये रुपांतरित करते. जी स्क्रब करताना आपल्या चेहऱ्यापासून विभक्त होते आणि आपली त्वचा पुन्हा चमकू लागते.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -