घरलाईफस्टाईलकारमध्ये असू शकतो धोकादायक संसर्ग; असा करा बचाव

कारमध्ये असू शकतो धोकादायक संसर्ग; असा करा बचाव

Subscribe

पण गेले १५-१६ महिने कोरोना महामारीविरोधात लढतोय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आलं. यामुळे लोकं घरातच बंदीस्त होती. काही ठिकाणी अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेकजण त्यांच्या कारमधून प्रवास करत आहेत. परंतु तुमच्या या कारमध्ये धोकादायक संसर्ग लपून राहू शकतो. जर तुम्ही याबाबत काळजी घेतली नाही तर तुम्हाला धोकादायक संसर्ग होऊ शकतो.

स्टीअरिंग व्हील

एका अहवालानुसार, एका स्मार्टफोनची स्क्रीन टॉयलेटच्या तुलनेत ३ ते १० पट जास्त घाण असते. तसंच कारच्या आतील व्हीलची स्थिती अधिक वाईट आहे. यूकेमधील वाहन खरेदीदाराने केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की आपल्या स्मार्टफोनपेक्षा कारचे अंतर्गत भाग २,१४४ टक्के घाण असू शकतात.

- Advertisement -

फ्लोअर मॅट

गाडी घाण होऊ नये म्हणून आपण फ्लोअर मॅट टाकतो. त्यामुळे आपण बाहेरून आल्यावर गाडीत आपले शूज, चपला ठेवतो. यामुळे रोगजंतू गाडीमध्ये येतात.

- Advertisement -

चालकाची जागा

ड्रायव्हरची सीट आणि त्याच्या आसपासची जागा जसे की दरवाजाचे हँडल देखील महत्वाचे आहे. ड्रायव्हर स्टीयरिंगवर शिंकतो, काही खातो आणि पुन्हा चाक वर हात ठेवतो किंवा दाराचा हँडल वापरतो.

सिट्समधील जागा

आपण कितीही काळजी घेतली तरी खाण्याचे पदार्थ सीट्सच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेवर पडतात. यामुळे रोगजंतू वाढण्याचा धोका असतो.

मग काय करावे?

  • रबर मॅटऐवजी फॅब्रिक मॅट वापरा. साबण आणि पाण्याने त्यांना स्वच्छ करणे सोपे आहे.
  • स्टीयरिंग व्हील आणि सीट-अँटी-बॅक्टेरियल वाइप किंवा इतर कोणत्याही कार क्लीन्सरसह नियमितपणे स्वच्छ करा.
  • दर वर्षी AC च्या युनिटचे फिल्टर बदला.
  • केबिनच्या पृष्ठभागावर जंतुनाशक फवारणी वापरा, यामुळे विषाणूचा नाश देखील होतो.

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -