Friday, June 9, 2023
घर मानिनी खजूर खाण्याचे जाणून घ्या अगणित फायदे

खजूर खाण्याचे जाणून घ्या अगणित फायदे

Subscribe

खजूर खाणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. भारतामध्ये खजूराला ड्रायफ्रूट म्हणून पाहिलं जातं. खजूरापासून अनेक वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. खजूरामुळे अनेक प्रकारांच्या आजारांचा धोका कमी होतो. यासोबतच एका अभ्यासामध्ये खजूर गर्भवती महिलांवर खास परिणाम करतो. गर्भवती महिलांसाठी खजूर खाणं अत्यंत फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.

खजूर खाण्याचे आहेत अगणित फायदे

- Advertisement -

  • खजूरामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात. यामध्ये एन्टीऑक्सीडेंट आणि विटामीन असतात. सकाळी खजूर खाल्ल्याने दिवसभर त्याची ऊर्जा तुम्हाला मिळते.
  • खजूर मधुमेह आणि अल्जाइमर सारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी देखील मदत करते. तसेच यातील कॅरोटीनॉयड डोळ्यांसाठी उपयुक्त असतो. तसेच हे हृदयासाठी देखील फायदेशीर आहे.
  • खजूरामध्ये विटामीन बी1, बी2, बी3, बी5, ए1 सोबतच अनेक प्रकारचे अमीनो अॅसीड देखील असते.
  • हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, जर गर्भवती महिलांनी प्रसुतीच्या एक महिना आधी खजूर खाल्ले तर प्रसुती काळात त्रास नाही. तसेच हे आई आणि मुलासाठी देखील उत्तम मानले जाते.

 


- Advertisement -

हेही वाचा :

काकडी आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही आहे वरदान

- Advertisment -

Manini