चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, याचे तोटेदेखील होऊ शकतात. मुलतानी माती बारीक सिलिकेट आणि अनेक खनिजांपासून बनवली जाते. सुंदर त्वचा, गुळगुळीत आणि चमकदार केस मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. मुलतानी मातीचा प्रमाणात उपयोग केला तर चेहऱ्याला काही होत नाही. पण तुम्ही जर नियमित मुलतानी मातीचा चेहऱ्यावर वापर करत असाल, तर ते तुमच्या चेहऱ्यासाठी हानिकारक करू शकते. काय आहेत मुलतानी मातीचे साइड इफेक्टस जाणून घेऊयात.
- तुमची त्वचा नाजुक असल्यास मुलतानी मातीचा वापर करणे बंद करावे. नाजुक त्वचेवर मुलतानी मातीचा लेप लावल्यास चेहऱ्यावर इनफेक्शन होऊ शकते.
- कोरडी त्वचा असणाऱ्यांनी मुलतानी माती लावण्याआधी त्यात अॅलोवेरा जेल, बदामाचे तेल किंवा मध मिक्स करावा. मुलतानी माती चेहऱ्याला लावल्यास तुमची त्वचा कोरडी पडते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येतात.
- मुलतानी माती चेहऱ्यावर जास्त प्रमाणात लावल्याने त्वचेवर ताण पडतो. परिणामी तुमची त्वचा ताणायला लागते.
- जर तुम्हाला कायम सर्दी , खोकला असेल तर मुलतानी माती वापरू नये. थंड असलेल्या मुलतानी मातीच्या वापरामुळे सर्दी , खोकला वाढण्याची शक्यता असते.
- ज्यांची स्किन खूप तेलकट आहे. ते लोक मुलतानी मातीचा लेप चेहऱ्याला लावतात. पण अशा वेळी ऋतू पाहून मगच हा लेप चेहऱ्याला लावावा. हिवाळ्यात लोक मुलतानी मातीचा लेप चेहऱ्याला लावू नये.
Edited By : Nikita Shinde