घरलाईफस्टाईलHealth Tips : पीनट बटर खाताय? तर सावधान! होईल 'हे' नुकसान

Health Tips : पीनट बटर खाताय? तर सावधान! होईल ‘हे’ नुकसान

Subscribe

तरुणाईमध्ये पीनट बटर खाण्याचा एक वेगळा ट्रेन्ड पाहायला मिळतोय. यात विशेषत: जिम करण्यांमध्ये पीनट बटर आवडीने खाल्ले जात आहे. आरोग्य तज्ज्ञांकडूनही पीनट बटर खाण्याचे अनेक फायदे सांगितले जात आहेत. याचे तुमच्या आरोग्यालाही अनेक प्रकारे फायदा होतो. यामध्ये प्रथिने, फायबर, फॅट आणि कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात. यामुळे आजकाल बाजारात पीनट बटर सहज उपलब्ध आहे. याचे फायदे अनेक असल्याने त्याला सुपर फूडच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. आयरन, जिंक, व्हिटामिन आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असलेले पीनट बटर भूक नियंत्रित करते. इतके फायदे असूनही काही समस्यांनी त्रस्त असलेल्यांनी याचे सेवन करू नये असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

या व्यक्तींने पीनट बटर खाणे टाळावे

1. जर एखादी व्यक्ती हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असेल तर त्याने पीनट बटर खाणे टाळावे. यामुळे तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. पीनट बटर खाताना त्याच्या प्रमाणाची काळजी घेणे आवश्यक आहे.

- Advertisement -

2. जर तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही पीनट बटरपासून दूर राहावे किंवा ते कमी प्रमाणात खावे. याचे अधिक सेवन केल्याने तुमचा लठ्ठपणा अधिक वाढू शकतो कारण त्यात प्रथिने आणि चरबी चांगली असते.

3. ज्या लोकांना त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो त्यांनी देखील त्याचे सेवन टाळावे. जर तुमच्या शरीरावर लाल पुरळ आणि रॅशेज उठण्याची समस्या असेल तर तुम्ही पीनट बटरपासून दूर राहणे आवश्यक आहे.

- Advertisement -

4. पीनट बटर जास्त खाल्ल्याने काही लोकांच्या पोटात ब्लॉटिंग आणि सूज येऊ शकते. यात हे उच्च फायबर असलेले अन्न आहे ज्यामुळे तुमचे पोट भरल्यासारखे वाटते.

5. किडनीशी संबंधीत आजार असलेल्या लोकांनी पीटन बटर खाऊ नये. कारण यात आढळणाऱ्या अफलाटॉक्सिन पॉयजनिंगमुळे यकृताला नुकसान होण्याचा धोका असतो, त्यामुळे त्याचे अतिसेवन टाळावे.


5G साठी राज्य सरकार आखणार नवे धोरण, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय एका क्लिकवर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -