जाणून घ्या ‘भोगी’ सणाचे काय आहे महत्त्व?

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. या सण संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो. फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं संबोधले जाते. पंजाबमध्ये हा सण ‘लोहिरी’ म्हणून साजरा करतात. तर तमिळनाडूमध्ये ‘भोंगीपोंगल’ म्हणून साजरा करतात. तर आसाममध्ये ‘भोगली बहू’ म्हणून साजरा करतात. तर राजस्थानमध्ये ‘उत्तरावन’म्हणून साजरा केला जातो. असा म्हणतात की या दिवशी जुन्या-वाईट गोष्टींचा त्याग केला जातो.

भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणारा असा आहे. या दिवशी खेड्यात घर स्वच्छ करुन दारात रांगोळी काढली जाते. तसेच या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात या दिवशी सासुरवाशीण मुली माहेरी जातात.

भोगिची भाजी रेसिपी by Archana's Kitchen

जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण भोगी असतो. तसेच यावेळी हिवाळा देखील असतो. विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. तसेच शेतात नवीन बहर देखील आलेला असतो. या सणानिमित्त भोगीच्या भाजीत ( प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.) आणि त्यासोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि मुगाची किंवा उडदाची खिचडी करण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे भोगीची भाजी अतिशय चवदार लागते. तसेच या दिवशी भोगीची भाजी घरा-घरात बनवली जाते. तसेच या भाजी बरोबर भाजरीची तीळ लावलेली भाकरी देखील खा्लली जाते. त्याचा नैवैद्य दाखवला देखील जातो.

 


हेही वाचा :

मकर संक्रांतीला ‘या’ सोप्या पद्धतीने तयार करा लुसलुशीत तीळ पोळी