घरलाईफस्टाईलया' वेळेत चुकून ही खाऊ नका दही.. काय होते वाचा

या’ वेळेत चुकून ही खाऊ नका दही.. काय होते वाचा

Subscribe

बहुतेक जण गरमीच्या दिवसांमध्ये दह्याचे सेवन करतात. कारण पोटात थंडपणा आणण्याबरोबर दह्याचे इतरही अनेक फायदे आहेत. दह्यासोबत दह्यापासून तयार होणारे छास, रायता हे पदार्थ अनेक जण आवडीने पितात. परंतु दह पिल्यानंतर काही पदार्थ्यांचे सेवन करणे टाळा असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. कारण दह्यासोबत इतर वेगळा पदार्थ खाल्ल्यास किंवा चुकीच्या वेळात दही खाल्ल्यास शरीरात विष तयार होत आहे.

दही खाण्याचे काय फायदे आहेत?

दहीमध्ये अनेक आवश्यक पौष्टिक घटक असतात जे शरीर मजबूत बनविण्यात फायदेशीर ठरतात. दह्यात बरेच हेल्दी बॅक्टेरिया आढळतात, जे पचनाक्रियेसंबंधीत आजार दूर करण्यास उपयुक्त ठरतात. तसेच दह्यात लॅक्टिक अँसिड, व्हिटॅमिन बी -6, बी -12, लोह, कॅल्शियम, राइबोफ्लेविनसारखे पोषण घटक असतात जे शरीरास रोगांपासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी ठरतात.

- Advertisement -

तसेच दही पोटॅशियमने समृद्ध असते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. दह्यातील कॅल्शियममुळे, रक्तवाहिन्या नसा मऊ राहतात, ज्यामुळे नसा संकुचित होत नाहीत आणि रक्त संचार योग्यरित्या होतो. अशा परिस्थितीत रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दहीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. याशिवाय सांध्यातील वेदना आणि हाडांच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत मिळते.

दहीचे सेवन कोणत्या वेळी करावे ?

दही खाण्याची सर्वांत योग्य वेळ म्हणजे सकाळ… सकाळच्या नाश्तामध्ये एक वाटी दह्यांत साखर मिसळून खाल्ल्यास रक्ताची कमतरता दूर होते. दही शरीरासाठी खूप चांगले असल्याचं मानलं जातं. यात काही केमिकल पदार्थही असतात. ज्यामुळे दूधांपेक्षा दही लवकर पचते. ज्या लोकांना पोटाचा त्रास असेल तर त्यांनी दही किंवा दह्यापासून बनवलेली लस्सी, ताक जरूर घ्यावे.

- Advertisement -

दही हे शरीरास थंड असले तरी रात्रीच्या वेळी दही खाल्ल्यास कफ, खोकला आणि सर्दी होऊ शकते. परंतु चुकीच्या वेळी दह्याचे सेवन केल्यास लठ्ठपणा आणि त्वचेच्या समस्यांना उद्धवू शकतात. तज्ज्ञांचे असे मत आहे की, दह्यामध्ये पित्त आणि कफ वाढविणारे घटक असतात. त्यामुळे त्याचे बेतात सेवन केले पाहिजे. तसेच दही नेहमीच दिवसा खावे, तसेच फ्रीजमध्ये ठेवलेले दही खाणे टाळा त्यामुळे ताजे दही आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते,

या गोष्टींसह दहीचे सेवन करू नये?

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, दूध आणि दही एकत्र खाऊ नये. कारण यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. याशिवाय दह्याबरोबर फळंही खाऊ नयेत. तसेच दही आणि मीठ खाल्ल्यास ब्लड प्रेशचा त्रास वाढतो. याशिवाय दही गरम खाऊ नये. तळलेले पदार्थ आणि दही एकत्र खाणेही हानिकारक आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -