घरलाईफस्टाईलकोथिंबीरचे आरोग्यवर्धक फायदे

कोथिंबीरचे आरोग्यवर्धक फायदे

Subscribe

कोथिंबीरचे आरोग्यदायी फायदे.

कोथिंबीरचा उपयोग अनेक वर्षांपासुन आहारात केला जातो. कोथिंबीर असल्यामुळे जेवणाला एक विशिष्ट स्वाद येतो. त्याचप्रमाणे कोथिंबीर ही आरोग्यासाठी देखील खुप फायदेशीर असते. यामध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, मिनरल असे अनेक पोषकतत्त्वे असतात. याव्यतिरिक्त कोथिंबरीमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, आयरन, केरोटीन, थियामीन, पोटोशियम आणि व्हिटॅमीन आहेत. कोथिंबीर पोटाच्या समस्यांसाठी फायदेशीर आहे. पचनक्रिया सुरळीत ठेवते.

नजर स्पष्ट होते

- Advertisement -

नियमित कोथिंबीरचा उपयोग आपल्या जेवणात केल्याने नजर स्पष्ट होते. कारण कोथिंबीरमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए असते जे डोळ्यांसाठी खुप आवश्यक असते.

त्वचेसाठी फायदेशीर

- Advertisement -

एक चमचा कोथिंबीरच्या ज्यूसला चिमुटभर हळदी सोबत मिळवा आणि पिंपल्सवर लावा, पिंपल्स नष्ट होतील. चेह-यावर तीळ असल्यावर रोज कोथिंबीर लावल्याने तीळ फिकट होतात.

टायफेड झाल्यास

टायफेड झाल्यास कोथिंबीरीचे पान सेवन करावे. यामुळे या रोगापासुन आराम मिळतो.

मासिक पाळी

अधिक मासिक पाळी आल्यावर ६ ग्राम धन्याच्या दाण्यांना अर्धा लीटर पाण्यात उकळवा. अर्धे झाल्यावर थोडी साखर मिसळवून ते गरम पाणी प्या.

केस गळत असल्यास

केस गळत असल्यास केसाला कोथिंबीरचा रस लावा.

पचनशक्ती वाढते

कोथिंबीर पोटाच्या समस्या दूर करते, पचनशक्ती वाढवते. ताज्या कोथिंबीरच्या पानांना ताकासोबत प्यायल्याने अपचन, मळमळ अशा अनेक समस्यांपासुन आराम मिळतो.

अपचन

कोथिंबीर, हिरवी मिर्ची, नारळ आणि अदरकची चटणी बनवून खाल्ल्याने, अपचनामुळे पोटात होणाऱ्या वेदनांपासुन आराम मिळतो. याव्यतीरिक्त अर्ध्या ग्लास पाण्यात दोन चमचे कोथिंबीर टाकून प्यायल्याने पोट दुखीपासुन आराम मिळतो.


टीप : हे उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास उत्तम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -