Friday, January 24, 2025
HomeमानिनीKitchen Tips : पाण्याशिवायही स्वच्छ होऊ शकते लादी

Kitchen Tips : पाण्याशिवायही स्वच्छ होऊ शकते लादी

Subscribe

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे अनेकजण पाण्याचा थेट स्पर्श करायला टाळाटाळ करतात. पाणी गार असल्यामुळे पाणी हाताळणे अवघड वाटते. त्यामुळे दैनंदिन स्वच्छतेच्या कामांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. विशेषतः दररोज लादी पुसणे हे घरातील सर्वात महत्वाचे काम असते. थंडीच्या दिवसात हे काम एका आव्हानाप्रमाणे वाटू लागते. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? पाण्याशिवायही लादी स्वच्छ होऊ शकते. आज आपण जाणून घेऊयात, पाण्याशिवाय लादी कशी स्वच्छ करायची.

माइक्रोफाइबर मॉपचा उपयोग करा

माइक्रोफाइबर मॉप हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही पाण्याशिवायही लादी स्वच्छ करू शकता. पाण्याशिवाय लादीचे डाग सहजपणे निघून जातील. या मॉबच्या कपड्यामुळे धूळ लगेच साफ होते.

ड्राय क्लिनिंग स्प्रे 

हल्ली मार्केटमध्ये असे ड्राय क्लिनिंग स्प्रे उपलब्ध आहे, जे लादी स्वच्छ करायला मदत करते. तुम्हाला हा स्प्रे लादीवर शिंपडून नंतर स्वच्छ कापडाने किंवा मॉपने पुसून घ्या.

वॅक्यूम क्लिनर

आजकाल बरेच लोक साफसफाईसाठी वॅक्यूम क्लिनर वापरतात. वॅक्यूम क्लिनरमुळे आपले काम देखील सोपे होते साफसफाई देखील लवकर होते.

मोपिंग वाइप्सचा उपयोग

ओले मॉप्स बदलण्यासाठी मॉपिंग वाइप्स हा एक उत्तम पर्याय आहे. हे वाइप त्वरीत घाण साफ करतात आणि घराला एक नवीन लूक मिळतो.

हेही वाचा : Healthy Diet : मधल्या वेळेत खाण्यासाठी हेल्दी स्नॅक्स ऑप्शन्स


Edited By : Prachi Manjrekar

 

 

Manini