घरलाईफस्टाईलभेंडीचे कमालीचे फायदे

भेंडीचे कमालीचे फायदे

Subscribe

लेडी फिंगर म्हणून ओळख असणारी हिरवी भाजी म्हणजे भेंडी , भाज्यांमध्ये बर्‍याच लोकांना ही भाजी पसंत असते, तर काही त्याला नापसंत करणारे लोक देखील असतात. मात्र या भेंडीचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच याचे सेवन कराल. जाणून घ्या भेंडीचे अनमोल फायदे…

cancer
भेंडीचे सेवन करा कँसरला पळवा

तुम्ही भेंडीचे सेवन केल्यास तुम्ही कँसरला पळवू शकता. खास करून कोलन कँसरला दूर करण्यासाठी भेंडी फारच फायदेशीर असते. आतड्यांमध्ये उपस्थित विषारी तत्त्वांना बाहेर काढण्यास भेंडी मदत करते, ज्याने तुमच्या आतड्या स्वस्थ राहतात आणि उत्तम प्रकारे काम करतात.

- Advertisement -
heart in hands
भेंडी खाल्याने हृदय रोग टळेल

भेंडी तुमच्या हृदयाला देखील स्वस्थ ठेवते. यात उपस्थित पॅक्टिन कोलेस्टरॉलला कमी करण्यास मदत करतो. तसेच विरघळणारे फायबर, रक्तात कोलेस्टरॉलला नियंत्रित करतो, ज्याने हृदय रोगाचा धोका कमी राहतो.

bone
भेंडी हाडांसाठी उपयुक्त

भेंडीत आढळणारा लसदार पदार्थ हाडांसाठी फारच उपयोगी असतो. यात असणारे व्हिटॅमिन-के हाडांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात.

- Advertisement -
Digestion
भेंडी पचन तंत्रासाठी फायदेशीर

भेंडी भरपूर फायबर असणारी भाजी आहे. यात असणारे लसदार फायबर पचन तंत्रासाठी फायदेशीर असतो. यामुळे पोटफुगी, कब्ज, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही.

eyes
भेंडी डोळ्यांकरता आरोग्यदायी

भेंडीमध्ये व्हिटॅमिन-ए, बीटा कॅरोटीन आणि एंटी-ऑक्सीडेंट्स भरपूर असते, जी सेल्युलर चयापचयाने उत्पन्न झालेले मुक्त कणांना समाप्त करण्यात सहायक असते. हे कण नेत्रहीनतेसाठी जबाबदार असतात. त्याशिवाय भेंडी मोतियाबिंदूपासून देखील तुमचा बचाव करते.

pregnancy
गर्भावस्थेत भेंडीचे सेवन लाभदायक

भेंडीत फोलेट नावाचा एक पोषक तत्त्व असतो जो गर्भाच्या मस्तिष्काचा विकास करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.

weight loss
वजन कमी करण्यास मदत होते

भेंडी तुमचे वजन कमी करण्यात मदत करते. तसेच तुमच्या त्वचेला यंग बनवून ठेवते. याचा प्रयोग केल्याने केस सुंदर, दाट आणि चमकदार बनतात. यात असणारा लसदार पदार्थाला लिंबासोबत शँपूसारखे वापरू शकता.

diabetes
भेंडीचे सेवन केल्याने मधुमेह होण्याचा धोका कमी

यूगेनॉल मधुमेहसाठी फारच फायदेशीर असतो. हा शरीरात ग्लोकोजच्या स्तराला वाढवण्यापासून बचाव करतो.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -