घरलाईफस्टाईलHigh Blood Pressure: जगभरात हाय बीपीने ग्रस्त असलेल्यांची संख्या 30 वर्षांत दुप्पट!

High Blood Pressure: जगभरात हाय बीपीने ग्रस्त असलेल्यांची संख्या 30 वर्षांत दुप्पट!

Subscribe

गेल्या तीस वर्षांत रक्तदाबाची प्रकरणे साधारणतः दुप्पट झाली आहेत. उच्च रक्तदाबाबाबत लॅन्सेट जर्नलमध्ये एक संशोधन प्रकाशित झाले आहे. द लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये २५ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार १९९० पासून उच्च रक्तदाब असलेल्या लोकांची संख्या दुप्पट झाली आहे. या करण्यात आलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, ४१ % स्त्रिया आणि ५१ % उच्च रक्तदाब असलेल्या पुरुषांना त्यांच्या स्थितीबद्दल माहिती नव्हती, याचा अर्थ असा की कोट्यवधी लोक प्रभावी उपचारांपासून वंचित आहेत.सर्व पीडित रूग्णांपैकी निम्मे म्हणजे साधारणतः ७२० मिलीयन लोकांनी २०१९ मध्ये रक्तदाबावर कोणतेही उपचार घेतले नाही.

उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंड आणि हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. एवढेच नाही तर उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची समस्या येऊ शकते. गेल्या ३० वर्षांमध्ये उच्च रक्तदाबाचे दर जागतिक स्तरावर कसे विकसित झाले हे शोधण्यासाठी, नॉन-कम्युनिकेबल डिसीज रिस्क फॅक्टर कोलाबोरेशन (NCD-RisC) च्या एका आंतरराष्ट्रीय गटाने १२०० पेक्षा जास्त राष्ट्रीय अभ्यासांतील डेटाचे विश्लेषण केले, ज्यामध्ये जगातील प्रत्येक देशाचा समावेश आहे. दरवर्षी उच्च रक्तदाबाचा आजार असणाऱ्या ८.५ मिलीयनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. संशोधनानुसार, १९९० मध्ये उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या महिलांची संख्या ३३१ मिलीयन होती तर पुरुषांची संख्या ३१७ मिलीयन होती. तर २०१९ मध्ये ६२६ मिलीयन स्त्रिया आणि ६२५ मिलीयन लक्ष पुरुष उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेले आढळून आले. म्हणजेच

- Advertisement -

दरम्यान, कॅनडा आणि पेरूमध्ये २०१९ मध्ये प्रौढांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे समोर आले, चारपैकी साधारण एक व्यक्ती या आजाराने ग्रासलेली होती. तैवान, दक्षिण कोरिया, जपान, स्वित्झर्लंड, स्पेन आणि यूके मध्ये महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण २४ %पेक्षा कमी आहे. इरिट्रिया, बांगलादेश, इथिओपिया आणि सोलोमन बेटांमध्ये पुरुषांमध्यील उच्च रक्तदाबाचे प्रमाण सर्वात कमी २५ %पेक्षा कमी आढळून आले. तर दुसऱ्या टोकाला, पॅराग्वे आणि तुवालूमध्ये अर्ध्याहून अधिक महिला आणि अर्जेंटिना, पॅराग्वे आणि ताजिकिस्तानमधील अर्ध्याहून अधिक पुरुषांना उच्च रक्तदाब होता, असे या अभ्यासातून समोर आले. दरम्यान, संशोधकांनी असे सांगितले की, यावरून उच्च रक्तदाबाचे निदान आणि उपचारांमध्ये वाढ करण्याची तातडीची गरज दिसून आली. तर जागतिक स्तरावर चारपैकी एक महिला आणि पाच पुरुषांपैकी एकावर रक्त दाबाचा उपचार केला जात आहे.


 

- Advertisement -

 

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -