Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health लेट नाइट एंग्जायटीची समस्या असेल तर 'या' टीप्स करा फॉलो

लेट नाइट एंग्जायटीची समस्या असेल तर ‘या’ टीप्स करा फॉलो

Subscribe

काही लोक रात्री झोपल्यानंतर अचानक दचकून उठतात. त्यांच्या डोक्यात सतत काही ना काही विचार सुरु असतात आणि त्यापैकीच एखाद्या गोष्टीची वारंवार आठवण होत राहते. आजूबाजूला असणारी तणावाची स्थिती सुद्धा याचे एक मुख्य कारण असते. खरंतर एंग्जायटी म्हणजे अशी एखादी स्थिती किंवा गोष्टी जी होऊ शकते अथवा नाही सुद्धा. मुलं परिक्षेच्या कारणास्तव एंग्जायटीच्या समस्येचा सामना करतात, तर मोठी माणसे काही निर्णयांच्या कारणास्तव याचा सामना करातात. अशाच जाणून घेऊयात अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे वारंवार एंग्जायटी ट्रिगर होते आणि त्यावर उपाय काय आहेत. (late night anxiety remedies)

पुढील संकेत सांगतात तुम्ही एंग्जायटीचे शिकार आहात
-एकाग्रतेत कमतरता
-रात्री पूर्ण झोप न होणे
-सतत उदास, नाराज राहणे
-अॅसिडिटी आणि पोट दुखीची समस्या

- Advertisement -

जर तुम्ही नाइट एंग्जायटीचे शिकार असाल तर काही गोष्टींपासून स्वत:ला काही गोष्टींपासून दूर ठेवावे. आपले मन शांत ठेवण्यासाठी अशा लोकांपासून दूर रहावे जे तुम्हाला त्रास देतील. पुरेशी झोप घेणे फार महत्त्वाचे असते. यामुळे रात्रीच्या वेळेस झोपताना एखादा असा व्हिडिओ किंवा अशी कोणतीही गोष्ट ज्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होऊ शकता ती पाहू नका.

एंग्जायटीवर उपाय
-स्थिती मान्य करा
जर तुम्ही एखाद्या स्थितीवेळी घाबरत असाल तर त्याला सामोरे जाण्यासाठी त्या स्थितीत स्वत:ला तयार करा. अशी लोक जी मानसिक समस्येचा सामना करत असतील किंवा आयुष्यात अनेक चढउतारातून जात असतील त्यांनी स्वत: वर आधी लक्ष द्या, काही गोष्टी मान्य करा. असे केल्याने काही गोष्टी सोडवणे सोपे होईल.

- Advertisement -

-समस्येवर विचार करा
एखाद्या स्थितीला मान्य केल्यानंतर त्यावर विचार करण्यास सुरुवात करा. त्या स्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरुन तुम्ही त्या स्थितीत स्वत:ला सावरू शकता. तुम्ही घाबरून समस्येपासून पळ काढत असाल तर समस्या वाढू शकते. त्यावेळी तुम्ही त्याचा सामना करा आणि त्यामधून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग शोधा. या व्यतिरिक्त मनोवैज्ञानिकांचा सल्ला ही घेऊ शकता.

-एक्सरसाइजसाठी वेळ काढा
जेव्हा तुम्ही एक्सरसाइजसाठी थोडा वेळ काढलात तर तुमचे तन आणि मन ही शांत होते. यामुळे तुमच्या शरिरात हॅप्पी हार्मोन्स उत्सर्जित होऊ लागतात. तुमच्या आयुष्यातील चिंता कमी झाल्यासारखे वाटत राहते. सकाळच्या वेळेस थोडी एक्सरसाइज केल्यास तर तुम्हाला फ्रेश वाटू शकते.

-रात्री झोपण्यापूर्वी स्क्रिनचा वापर करणे टाळा
रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही स्क्रिनचा वापर करणे टाळा. असे न केल्यास तर झोपेत अडथळा येऊ शकतो. पूर्णपणे झोप झाली नाही तर एंग्जायटीचे शिकार होऊ शकता. झोपण्यापूर्वी काही तास आधी इलेक्ट्रॉनिक डिवाइसपासून दूर रहा.

-संध्याकाळी कॅफेनचे सेवन करणे टाळा
कॅफेनचे सेवन रात्रीच्या झोपेवेळी केल्याने तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकत नाही. यामध्ये असलेले तत्त्व मनाला अलर्ट करतात. यामुळेच तुम्हाला झोप लागत नाही. सकाळी उठल्यानंतर ही तुम्हाला फ्रेश वाटत नाही. झोप पूर्ण न झाल्यास तुम्ही तणावाखाली जाऊ शकता. अशातच रात्रीच्या वेळी कॅफेनचे सेवन करण्यापासून दूर रहा.


हेही वाचा- Acidity कमी करण्यासाठी मुलेठी येईल कामी

 

- Advertisment -

Manini